कन्याकुमारी ते खारदुंगला सायकल प्रवास करणाºया तरुणीचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 06:09 PM2017-07-29T18:09:43+5:302017-07-29T18:15:32+5:30
सातारा, दि. २९ : हरियाणा येथील सुनिता सिंग चौकन (वय ३०) हिने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ तसेच पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी ते खारदुंगला असा पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास सायकल मोहीम राबविली आहे. तिचे साताºयात उत्साहात करण्यात आले.
सातारा, दि. २९ : हरियाणा येथील सुनिता सिंग चौकन (वय ३०) हिने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ तसेच पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी ते खारदुंगला असा पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास सायकल मोहीम राबविली आहे. तिचे साताºयात उत्साहात स्वागत करण्यात आले.
सुनिता सिंग चौकन हिने कन्याकुमारी येथून चौदा दिवसांपूर्वी सायकलवरुन प्रवास सुरू केला. आत्तापर्यंत तिने १ हजार ४५० किलोमीटरचे अंतर कापले आहे. या प्रवासात ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ती मार्गातील शहरांमध्ये ‘बेटी बचाव’चा प्रचार करत आहे.
साताºयातील पोवई नाका परिसरात तिचे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता आगमन झाले. आशिष जेजुरीकर, विशाल बाबर, विनय नाईक, शिल्पा पवार, तुषार भोईटे, मकरंद अपशिंगकर, संकेत चोरगे, अमर सावंत, श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे श्रावण पाटील, एकनाथ थोरात यांनी तिचे स्वागत केले.
सुनिता चौकन हिने २०११ मध्ये माउंट एव्हरेस्ट सर केले. तिला किल्ले, गडकोड पाहण्याची व अभ्यासाची आवड आहे. साहजिकच तिच्यासाठी सातारा महत्त्वाचा पल्ला होता. साताºयात मुक्काम केला. त्यानंतर स्थानिक तरुणांसमवेत तिने पर्यावरण जागृतीसाठी वृक्षारोपण केले. सातारा शहर परिसरात पाच झाडांचे रोपण करुन शनिवारी ती पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
कन्याकुमारी ते खारदुंगला सायकल मोहीम राबविलेल्या सुनिता सिंग चौकन हिचे शुक्रवारी साताºयात स्वागत करण्यात आले. यावेळी आशिष जेजुरीकर, विशाल बाबर, विनय नाईक, शिल्पा पवार, तुषार भोईटे उपस्थित होते.