कºहाडात अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 02:25 PM2017-08-16T14:25:42+5:302017-08-16T14:29:51+5:30

कºहाड : कºहाड शहरातील बसस्थानक परिसर, मुख्य टपाल कार्यालय मार्गावरील रस्त्याकडेला असलेल्या अतिक्रमणावर पालिकेच्यावतीने बुधवारी कारवाई करण्यात आली. यावेळी चारचाकी हातगाडे, दुकानविक्रीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. तसेच रस्त्याकडेला बसलेल्या भाजी विक्रेत्यांनाही न बसण्याच्या सुचना करण्यात आल्या.

कºहाड पालिकेच्या बांधकाम विभागातर्फे बसस्थानक परिसरात बुधवारी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. (छाया : युवराज मस्के) | कºहाडात अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

कºहाडात अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

Next
ठळक मुद्देकºहाड पालिकेची कारवाई बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे काढली

कºहाड : कºहाड शहरातील बसस्थानक परिसर, मुख्य टपाल कार्यालय मार्गावरील रस्त्याकडेला असलेल्या अतिक्रमणावर पालिकेच्यावतीने बुधवारी कारवाई करण्यात आली. यावेळी चारचाकी हातगाडे, दुकानविक्रीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. तसेच रस्त्याकडेला बसलेल्या भाजी विक्रेत्यांनाही न बसण्याच्या सुचना करण्यात आल्या.

यावेळी पालिकेतील अतिक्रमण नियंत्रण पथक प्रमुख मिलिंद शिंदे, अन्न निरीक्षक रनजीत पवार, मारूती काटरे, अभिजित खवळे, रामचंद्र भिसे, अशोक कांबळे, संजय लादे आदिंसह पंचवीस कर्मचारी उपस्थित होते. 
आज सकाळी दहा वाजता या अतिक्रमण हटाव मोहिमेस चार ट्रॅक्टरच्या साहाय्याने  प्रारंभ करण्यात आला.

सुरूवातील मुख्य टपाल कार्यालय ते कर्मवीर भाऊराव पुतळा व बसस्थानक मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात आली. कºहाड नुकतीच  शांतता कमिटी बैठक झाली होती. यामध्ये अतिक्रमण काढण्याबाबत नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांनी चर्चाही केली होती.

या  बैठकीत निर्णयही घेण्यात आला . त्यानुसार मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. यावेळी दुपारपर्यंत विनापरवाना धारक ३५ हातगाडे जप्त करण्यात आले. अजून काही दिवस ही मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण नियंत्रण पथकाचे प्रमुख मिलिंद शिंदे यांनी दिली.

Web Title: कºहाड पालिकेच्या बांधकाम विभागातर्फे बसस्थानक परिसरात बुधवारी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. (छाया : युवराज मस्के)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.