कोयना धरणात ७७ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 07:03 PM2017-07-29T19:03:31+5:302017-07-29T19:05:35+5:30
पाटण(जि. सातारा), दि. २९ : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून पंधरा तासांत एक टीएमसीची भर पडली. धरणात ७७.६५ टक्के ८१.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाच्या वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

जिल्ह्यात शनिवारी पहाटे आणि शुक्रवारी दिवसभरात सरासरी १५५ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत सरासरी १४.४ मिलीमीटर पाऊस झाला.
तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा :
सातारा १.८, जावळी ११.३, पाटण ३४.५, कºहाड ८.३, कोरेगाव ०.४, खंडाळा ४.२, वाई ६.५, महाबळेश्वर ८८.६.
पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता गृहित धरून रविवारी सकाळी अकरा वाजता धरणाचे दरवाजे दोन फुटांनी उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.