लोकमतच्या रक्तदान महायज्ञास कराडला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:19+5:302021-07-04T04:26:19+5:30
कराड : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त शारदा क्लिनिक, एरम हाॅस्पिटल येथे आयोजित ...
कराड : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त शारदा क्लिनिक, एरम हाॅस्पिटल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.
लोकमतच्या वतीने ''रक्ताचं नातं'' ही भव्य रक्तदान मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानिमित्ताने शारदा क्लिनिक हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. डॉ. चिन्मय एरम, रोहिणी एरम, डॉ. सचिन थोरात, रेणुका पालकर, संजीव महाजनी, अमृता काशीद, अमृता भंडारे, रूपाली जाधव, अर्चना नष्टे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाचे महामारी संकट सर्वत्र थैमान घालत आहे. त्यातच राज्यात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन लोकमतच्या वतीने ''रक्ताचं नातं'' ही भव्य रक्तदान मोहीम राबविली जात आहे. त्याचाच भाग म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरात करिष्मा मुल्ला (ओ ), रूपाली जाधव (बी), शैलजा बुबनाळे (ओ ), राजू जगताप (ओ ), पोर्णिमा वाघमारे (ए बी ), धैर्यशील काळे (बी ), लक्ष्मण राजोळी (बी ), संतोष बनसोडे (ए), अजित देशमुख (ए बी), शिवाजी माळी (ए), स्नेहा तोडकर (ए ) आदींनी रक्तदान केले.
चौकट
त्यांनी केले आजवर ६० वेळा रक्तदान
चौंडेश्वरी नगर गोवारे (ता कराड) येथील लक्ष्मण राजोळी यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. विशेष म्हणजे राजोळी यांनी आत्तापर्यंत साठ वेळा रक्तदान केले आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
फोटो
कराड येथील शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर.