धैर्यशील कदम यांचा शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश, कराड उत्तर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 02:25 PM2022-08-26T14:25:32+5:302022-08-26T14:26:06+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यावेळी त्यांनी आपली खदखद मांडली होती. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही.

Karad Uttar leader Darhysheel Kadam joins BJP | धैर्यशील कदम यांचा शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश, कराड उत्तर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार

धैर्यशील कदम यांचा शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश, कराड उत्तर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार

googlenewsNext

औंध : कराड उत्तरचे नेते धैर्यशील कदम यांनी गुरुवारी शिवबंधन तोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. कराड उत्तरमधील विकासकामांना गती देऊन धैर्यशील कदमांना ताकद देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात धैर्यशील कदम यांची मोठी ताकद आहे. २०१९ विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवली होती. राज्यात मविआ सरकार आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे मतदारसंघाच्या विकास कामांना निधी मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र सत्तेवर असताना माजी सहकारमंत्री यांच्या दबावामुळे शिवसेनेने त्यांना वाऱ्यावर सोडले. विकासकामाच्या अनेक फाईल बाजूला टाकल्या. त्यामुळे सत्ता असतानादेखील धैर्यशील कदम यांची कोंडी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यावेळी त्यांनी आपली खदखद मांडली होती. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही.

राज्यात आता सरकार बदलले आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता शिवबंधन तोडून धैर्यशील कदमांनी अखेर गुरुवारी मुंबई येथे भाजपा कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, रहिमतपूर नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश माने यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.

दरम्यान, धैर्यशील कदम यांच्या कामाची पध्दत आपल्याला माहिती आहे. अशा धाडसी नेतृत्वाला ताकद देऊन पुढील काळात मतदारसंघातील कामांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवेशाच्या वेळी दिली.

विकासाचा बँकलाॅग भरून काढणार

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक विकासाची कामे रखडली आहेत. माजी पालकमंत्र्यांनी सत्तेच्या काळात आपल्या बगलबच्च्यांचा विकास साधला आहे. गटतट बघून अनेक विकासकामे अडवण्याचे पाप केले आहे. मतदारसंघातील विकासकामांना गती देण्याबरोबर विकास कामांचा बॅकलाॅग भरून काढण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. - धैर्यशील कदम, चेअरमन, वर्धन ॲॅग्रो कारखाना

Web Title: Karad Uttar leader Darhysheel Kadam joins BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.