कराडचे कोटा ज्युनियर काॅलेज ऑफ सायन्स सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:39 AM2021-04-24T04:39:28+5:302021-04-24T04:39:28+5:30
कराड येथील कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्सला इनोव्हेटिव्ह युज ऑफ टेक्नॉलॉजी अवॉर्डने गोवा येथे सन्मानित करण्यात आले. एज्युएक्सलन्स या ...
कराड
येथील कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्सला इनोव्हेटिव्ह युज ऑफ टेक्नॉलॉजी अवॉर्डने गोवा येथे सन्मानित करण्यात आले. एज्युएक्सलन्स या दिल्लीच्या संस्थेने हा पुरस्कार दिला आहे. आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर डॉ. हरीश चौधरी यांच्या हस्ते ज्ञानांगण एज्युकेशन सोसाटीचे व कोटा जुनिअर कॉलेजचे संस्थापक डॉ.महेश खुस्पे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कोविडच्या कठीण परिस्थितीत कोटा जुनिअर कॉलेजने विद्यार्थ्यांना अतिशय उच्च प्रतीच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गेले वर्षभर ऑनलाइन शिक्षण दिले, विविध ऍप्सद्वारे परीक्षा घेतल्या तसेच ऑनलाइन स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिले. ऑनलाइन शिकवताना अत्यंत प्रोफेशनल पद्धतीचा वापर केला गेला. विशेष प्रकारे डेव्हलप केलेल्या प्लॅटफॉर्म वर हे ऑनलाइन लेक्चर्स घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी देशातील उत्तम गेस्ट लेक्चर उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे विविध नावीन्यपूर्ण घटकांचा वापर करून विद्यार्थांना शिकवले जात आहे. हा पुरस्कार देताना विविध १० मापदंड विचारात घेण्यात आले होते. या मापदंडाचा उपयोग करून गुण दिले होते. या सर्व मापदंडांमध्ये कोटा जुनिअर कॉलेजने उत्तम कामगिरी नोंदविली. त्यामुळे इनोव्हेटिव्ह युज ऑफ टेक्नॉलॉजी अवॉर्ड पारितोषिक कॉलेजला मिळाले.
कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या सर्व कर्मचारी वर्गाच्या तसेच पालक व विद्यार्थी वर्गाच्या सहकार्यामुळेच हे साध्य झाले. असे कोटा जुनिअर कॉलेजचे संस्थापक डॉ. महेश खुस्पे यांनी सांगितले. हा पुरस्कार मिळवण्यामध्ये कॉलेजचे कर्मचारी यांनी अविरत श्रम घेतले असल्याचे संस्थेच्या उपाध्यक्षा मंजिरी खुस्पे यांनी सांगितले. प्रा. जयश्री पवार, विजया शेवाळे, सविता मोहिते, सुवर्णा पाटील यांनी विशेष परिश्रम करून नावीन्यपूर्ण टेक्नॉलॉजी कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्समध्ये राबविल्या व विद्यार्थ्यांना त्याबाबत प्रशिक्षित केले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (वा.प्र.)
फोटो