कराडच्या युवतीचा पुण्यात गळा दाबून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:04 AM2019-02-25T00:04:00+5:302019-02-25T00:04:05+5:30
कºहाड/नºहे : पुण्यातील झील महाविद्यालयात शिकणाऱ्या कºहाडातील युवतीचा प्रियकराने गळा दाबून खून केल्याचे रविवारी उघडकीस आले. तिचा मृतदेह पुण्यातील ...
कºहाड/नºहे : पुण्यातील झील महाविद्यालयात शिकणाऱ्या कºहाडातील युवतीचा प्रियकराने गळा दाबून खून केल्याचे रविवारी उघडकीस आले. तिचा मृतदेह पुण्यातील फ्लॅटमध्ये आढळून आला.
सोनाली आनंदराव भिंगारदिवे (वय २३, मूळ रा. विजयनगर, ता. कºहाड, सातारा) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कºहाडनजीक वियजनगर येथे राहणारे शिक्षक आनंदराव भिंगारदिवे यांची मुलगी सोनाली ही पुण्यात झील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. गत चार दिवसांपासून ती संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली. वारंवार संपर्क करूनही संपर्क होत नसल्यामुळे वडील आनंदराव भिंगारदिवे यांच्यासह कुटुंबीय पुण्याला गेले. त्याठिकाणी त्यांनी बेपत्ता सोनालीचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी याबाबतची फिर्याद पोलिसांत दिली. पोलीस चार दिवसापांसून बेपत्ता सोनालीचा शोध घेत होते.
दरम्यान, झील महाविद्यालयानजीक असलेल्या एका इमारतीतील रूममधून उग्र वास येत असल्याचे परिसरातील नागरिकांना जाणवले. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी रविवारी खोली उघडून पाहिले असता, गळा चिरलेल्या स्थितीत युवतीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी ओळख पटविली असता संबंधित युवतीचे नाव सोनाली भिंगारदिवे असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याबाबतची माहिती भिंगारदिवे कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयही तातडीने त्याठिकाणी दाखल झाले.
दरम्यान, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सोनाली भिंगारदिवे ही संबंधित रूम भाडेतत्त्वावर घेऊन संशयित आरोपी सोमेश घोडके याच्यासोबत राहत होती, असे निष्पन्न झाले. तसेच त्या दोघांनी घरमालकाला आमचे लग्न झाले असल्याचेही सांगितले होते. मात्र, सोनालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सोमेशने चाकूने सोनालीचा गळा दाबून खून केला.
ही घटना सुमारे १९ फेब्रुवारीला घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, आरोपीने लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना आढळली आहे. त्यामध्ये त्याने खुनाचा खुलासा केला असून, मी स्वत:ही आत्महत्या करणार असल्याचे त्यात त्याने नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनालीचा खून केल्यानंतर दरवाजाला बाहेरून कडी लावून संशयित आरोपी फरार झाला आहे. पोलीस संशयित सोमेश घोडके याचा शोध घेत आहेत. अधिक तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाणे करीत आहे.