काेराेनाच्या ‘डेल्टा प्लस’ ने वाढविली साताऱ्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:41+5:302021-06-25T04:27:41+5:30

सातारा : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जिल्ह्यात बरीच हानी केली. आता डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंतेचे कारण बनला आहे. नुकतेच महराष्ट्रात ...

Kareena's 'Delta Plus' raises concerns in Satara | काेराेनाच्या ‘डेल्टा प्लस’ ने वाढविली साताऱ्याची चिंता

काेराेनाच्या ‘डेल्टा प्लस’ ने वाढविली साताऱ्याची चिंता

Next

सातारा : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जिल्ह्यात बरीच हानी केली. आता डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंतेचे कारण बनला आहे. नुकतेच महराष्ट्रात हे नवे रुग्ण आढळून येऊन लागल्याने सातारा जिल्ह्याची चिंता अधिकच वाढू लागली आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये प्रचंड नुकसान झाले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. एखाद्या चक्रीवादळाप्रमाणे या लाटेने माणसाचे आयुष्य उद्ध्वस्थ केले. ही लाट ओसरत नाही तोपर्यंत आता डेल्टा प्लसचे नवे संकट सातारा जिल्ह्यावर आ वासून उभे राहिले आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे आणि जास्तीत जास्त लोकांच्या कोरोना चाचण्या करणे, हे उद्दिष्ट्य ठेवून या नव्या डेल्टा प्लसच्या संकटाला सामोरे जाण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या नव्या डेल्टा प्लसची लक्षणे अगदी कोरोनासारखी असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात काय खबरदारी?

nसातारा जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लसचे नवे संकट उभे राहिले आहे. मात्र, सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र, तरी सुद्धा आरोग्य विभाग सतर्क झाले आहे.

nजिल्ह्यात सध्या आढळून आलेल्या कोरोना बाधितांच्या विषाणूंचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

nकोरोना चाचण्या वाढविण्यावर भर तसेच लसीकरणही वेगाने सुरू आहे. दिवसाला १२ हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत, तर दहा हजार जणांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.

जिल्ह्यात दरराेज बारा हजार टेस्टिंग सुरू

सातारा जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांचा वेग वाढविला आहे. चोवीस तासांत तब्बल १२ हजार १५९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने चाचण्या केल्या जात असल्यामुळे अद्यापही सातारा जिल्ह्यात ८०० जण बाधित आढळून येत आहेत, तर २० ते २२ जणांचा मृत्यू होत आहे.

कोरोना चाचणीबरोबरच लसीकरणाचाही वेग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पाॅझिटिव्हिटी रेट ६ टक्के आहे

Web Title: Kareena's 'Delta Plus' raises concerns in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.