कऱ्हाडला कर भरणाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:36 AM2021-04-03T04:36:00+5:302021-04-03T04:36:00+5:30
कऱ्हाड : नवीन आर्थिक वर्षात पहिल्याचदिवशी कऱ्हाडला चौघांनी चालू वर्षाचा संकलित कर भरला. पहिल्याचदिवशी २० हजारांची कर वसुली झाली. ...
कऱ्हाड : नवीन आर्थिक वर्षात पहिल्याचदिवशी कऱ्हाडला चौघांनी चालू वर्षाचा संकलित कर भरला. पहिल्याचदिवशी २० हजारांची कर वसुली झाली. अतुल शिंदे, रत्नाकर शानबाग, राजेंद्र ढेरे यांचा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
--------------------------
कुरवड्यांची घाई
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील ग्रामीण भागात कुरवड्या, भातवड्या करण्याची घाई सुरू झाली आहे. सांडगे, उडीद-पापड, पाटांवरील शेवया आदी उन्हाळी पदार्थ केले जातात. सध्या उन्हाळा चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळे हे बनविण्याची घाई दिसून येते. ग्रामीण भागात महिला या कामात व्यस्त दिसत आहेत.
-------------------------------
खड्ड्यांची डागडुजी चुकीची
कऱ्हाड : येथील शनिवार पेठेतील पोपटभाई पेट्रोल पंपाजवळ दोन दिवसांपूर्वीच पालिका कर्मचाऱ्यांनी ड्रेनेजच्या चेंबरसाठी मोठा खड्डा काढला होता. गुरुवारी तो बुजविण्यात आला, पण तो चुकीच्या पध्दतीने भरल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याबरोबर अपघाताला निमंत्रण मिळत आहे. तरी त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
----------------------------
प्राचार्यपदी बी. आर. पाटील
कराड :
उंडाळे (ता. कऱ्हाड) येथील दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी बी. आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संचालक आनंदराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.