कऱ्हाडला दहा मतदारसंघातून १२२ अर्ज दाखल
By admin | Published: July 14, 2015 12:21 AM2015-07-14T00:21:40+5:302015-07-14T00:21:40+5:30
बाजार समिती निवडणूक : आता अर्ज छाननीकडे लक्ष
कऱ्हाड : कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या १९ जागांसाठी दहा मतदारसंघातून एकूण १२२ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी एल. एन. घनवट यांच्याकडे दाखल झाले आहेत.
अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे : विकास सोसायटी मतदारांतून ४३, ग्रामपंचायत मतदारसंघातून : २३, अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघातून : ३, आर्थिक दुर्बल मतदारसंघातून : ७, हमाल मापाडी मतदारसंघातून : ७, व्यापारी व आडते मतदारसंघातून : १३, कृषि प्रक्रीया मतदारसंघातून : २, महिला राखीव मतदार संघातून : ११, इतरमागासवर्गीय राखीव मतदार संघातून : ६, विमुक्त जाती, भटक्या जमाती राखीव मतदार संघातून : ७ असे एकूण १२२ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले आहे.
बुधवारी, दि. १५ रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दि. ३० व ३१ जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ ठेवण्यात आली आहे. ३० आॅगस्ट रोजी मतदान होणार असून ३१ आॅगस्ट रोजी मतमोजणी केली जाणार आहे. विकास सोसायटीच्या मतदारसंघातील ७ सर्वसाधारण, २ महिला राखीव, इतर मागासवर्गासाठी १ तर भटक्या विमुक्त जाती व जमातीसाठी १ जागा असणार आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातील ४ संचालकांपैकी सर्वसाधारण २, १ अनुसूचित जाती व जमातीसाठी १ तर आर्थिक दुर्बल जागेसाठी १ जागा असणार आहे. हमाल मापाडी मतदारसंघातून १ संचालक निवडणून द्यायचा असून त्यासाठी १७ मतदार तर व्यापारी व आडते मतदारसंघातून २ संचालक निवडून देण्यासाठी ५२८ मतदार आहेत. (प्रतिनिधी)