कऱ्हाडला ८०, पाटणला ७५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:26+5:302021-01-16T04:43:26+5:30

दरम्यान, तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ७५ ...

Karhad got 80 per cent votes and Patan got 75 per cent votes | कऱ्हाडला ८०, पाटणला ७५ टक्के मतदान

कऱ्हाडला ८०, पाटणला ७५ टक्के मतदान

Next

दरम्यान, तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ७५ टक्के मतदान झाले. एकूण १९६ मतदान केंद्रावर सुरळीत मतदान पार पडले. किरकोळ बाचाबाची आणि एक-दोन ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडण्याच्या घटनावगळता मतदान सुरळीत शांततेत पार पडले असल्याची माहिती पोलीस यंत्रणेकडून मिळाली.

कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीअखेर १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर ५ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ७३ हजार ६४६ पुरुष, ७२ हजार ४५६ स्त्रिया व इतर २ अशा १ लाख ४६ हजार १०४ मतदारांनी आपला हक्क बजावला. सरासरी ६९ टक्के मतदारांनी मतदान केले होते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत सरासरी ८० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक कार्यालयातून सांगण्यात आले.

पाटण तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींमध्ये ३९१ जागांसाठी ७७५ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. मतदानासाठी पहाटेपासूनच पुणे-मुंबईकडील चाकरमानी गावाकडे यायला सुरुवात झाली होती. मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या. त्यानंतर मात्र केंद्रांवर मतदारांची तुरळक उपस्थिती दिसली. तहसील यंत्रणेने मतदानाची एकत्रित आकडेवारी घेण्यासाठी देसाई कॉलेज येथील बॅडमिंटन हॉलमध्ये व्यवस्था केली होती तेथून मिळालेल्या आकडेवारीवरून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एकूण ७२ ग्रामपंचायतींसाठी ५६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या आकडेवारीवरून एकूण ६९ टक्के मतदान झाल्याचे समोर आले. मुरूड-मोरेवाडी आणि साखरी येथे मतदान केंद्रावर मतदान यंत्रात किरकोळ बिघाड झाल्यामुळे काहीवेळ प्रक्रिया थांबली होती तसेच पाटण तालुक्यातील अनेक मतदान केंद्रे दुर्गम भागांत असल्यामुळे तेथे उपस्थित असणारे झोनल ऑफिसर आणि केंद्राध्यक्षांचेकडून ऑनलाईन माहिती मिळण्यास फार विलंब लागत होता.

- चौकट

पाटण तालुक्यात चुरशीने मतदान

पाटण तालुक्यातील ‘सर्वांत मोठी ग्रामपंचायत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारळे ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ७८ टक्के मतदान झाले. येथे एकूण ६ हजार ७१९ मतदारांपैकी ५ हजार २१० मतदारांनी मतदान केले तसेच ढेबेवाडी विभागातील काळगाव ग्रामपंचायतीसाठी ६७.४५ टक्के, मूळगाव ग्रामपंचायतीसाठी ८४ टक्के आणि ढेबेवाडी विभागातील कुंभारगाव ग्रामपंचायतीसाठी ८३ टक्के मतदान झाले.

- चौकट

कोपर्डे हवेली विभागात टक्का वाढला

कोपर्डे हवेली : येथील ग्रामपंचायतीसाठी ८५ टक्के मतदान झाले. त्यामध्ये प्रभाग एकमध्ये ८६ टक्के, प्रभाग दोनमध्ये ८३ टक्के, प्रभाग तीनमध्ये ८५ टक्के, प्रभाग चारमध्ये ८६ टक्के तर प्रभाग पाचमध्ये सर्वांत कमी ८२ टक्के मतदान झाले. वडोली निळेश्वरमध्ये ८४ टक्के मतदान झाले. पार्ले गावात चुरशीने ८९ टक्के मतदान झाले. बनवडीत ७५ टक्के मतदान झाले.

- चौकट (फोटो : १५केआरडी०९)

तांबवे विभागात प्रक्रिया शांततेत

तांबवे : विभागातील तांबवे, गमेवाडी, साजूर, वस्ती व मौजे साकुर्डी, म्होप्रे, मुंढे आदी गावांत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दुपारपर्यंत अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. अनेक मतदान केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यात येत होता. तांबवे ग्रामपंचायतीसाठी ८१ टक्के एवढे मतदान झाले.

फोटो : १५केआरडी०८

कॅप्शन : कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी रांग लावली होती. (छाया : शंकर पोळ)

Web Title: Karhad got 80 per cent votes and Patan got 75 per cent votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.