भुकंपशास्त्रीयदृष्ट्या कऱ्हाड हे दख्खन पठारावरील महत्वाचे ठिकाण - केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू
By संजय पाटील | Published: October 6, 2023 05:45 PM2023-10-06T17:45:37+5:302023-10-06T17:46:53+5:30
केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी केले अभिवादन
कऱ्हाड : कऱ्हाडच्या भुकंप संशोधन केंद्राला विशेष महत्व आहे. याठिकाणी भुगर्भात बोअरवेल मारुन जमिनीत होणाऱ्या गतीविधी आणि भुकंप याचा अभ्यास केला जात आहे. भुकंपशास्त्राच्यादृष्टीने कऱ्हाड हे दख्खन पठारावरील महत्वाचे ठिकाण आहे, अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.
सातारा दौऱ्यावर आलेल्या मंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी दुपारी कऱ्हाडात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी भेट देवून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, कऱ्हाड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ, माजी नगरसेवक सुहास जगताप, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, अजय पावस्कर, श्री पेंढारकर, शार्दुल चरेगावकर, सागर शिवदास आदी उपस्थित होते.
मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा पर्यावरणीय संवेदनशिल प्रदेश आहे. भुविज्ञान संशोधनाच्यादृष्टीने येथे बरेच काही करण्यासारखे आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. या संशोधनाचा देशाला फायदा होणार आहे. भुकंप तसेच भुगर्भातील हालचालींची पुर्वसुचना मिळाली तर पुढील हानी टाळता येवू शकते. त्यामुळे त्यादृष्टीने संशोधन केले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा पर्यावरणीय संवेदनशिल प्रदेश!
पश्चिम महाराष्ट्र हा पर्यावरणीय संवेदनशिल प्रदेश आहे. भुविज्ञान संशोधनाच्यादृष्टीने येथे बरेच काही करण्यासारखे आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. या संशोधनाचा देशाला फायदा होणार आहे. भुकंप तसेच भुगर्भातील हालचालींची पुर्वसुचना मिळाली तर पुढील हानी टाळता येवू शकते. त्यामुळे त्यादृष्टीने संशोधन केले जात असल्याचेही मंत्री किरेन रिजिजू यांनी यावेळी सांगीतले.