कऱ्हाड पालिका : कचऱ्यामुळे ४३० जणांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:50 PM2018-03-13T23:50:56+5:302018-03-13T23:50:56+5:30
कऱ्हाड : शहर स्वच्छ राहावे तसेच लोकांचे आरोग्यही चांगले राहावे, यासाठी कºहाड शहरात पालिकेच्या वतीने स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेतली जात आहे.
कऱ्हाड : शहर स्वच्छ राहावे तसेच लोकांचे आरोग्यही चांगले राहावे, यासाठी कºहाड शहरात पालिकेच्या वतीने स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेतली जात आहे. शहरातून प्लास्टिक पिशव्यांवर निर्बंध लादत लोकांना स्वच्छतेविषयी सवय लागावी म्हणून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना कोणी दिसल्यास त्याचक्षणी त्याच्या हातात शंभर रुपयांची दंडाची शास्तीची पावती दिली जात आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल चार हजार तीनशे रुपयांचा दंड संबंधित लोकांकडून आकारण्यातही करण्यात आला आहे.
कऱ्हाड नगरपालिकेनेही शहर स्वच्छतेसाठी जणू शिवधनुष्यच उचलले की काय? असा प्रश्न सध्या सर्वांना पडत आहे. ठिकठिकाणी स्वच्छ वॉर्ड स्पर्धा, प्लास्टिकबंदी कारवाईची मोहीम, लोकांमध्ये घनकचºयापासून गांडूळ खत निर्मिती असे उपक्रम राबवित त्यांच्यात जनजागृती केली जात आहे. पालिकेतील सर्वच नगरसेवक, नगरसेविकांबरोबर स्वच्छतादूतही गृहभेटी देऊन लोकांना स्वच्छतेची सवय लागावी, म्हणून बहुमोल मार्गदर्शन करीत आहेत.
तर दुसरीकडे शहरातील रस्त्यावर पडणारा कचरा बंद व्हावा म्हणून रस्त्यावर कचराकुंड्या हटवून त्या ठिकाणी स्वच्छतेचे संदेश देणारे फलक ठेवून त्या सभोवताली आकर्षक रांगोळी काढली जात आहे.
तरीसुद्धा पालिकेच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कोणत्या स्वरुपाची कारवाई करावी, याचा विचार करीत त्यांना आता शंभर रुपयांचा दंड भरण्यास लावला जात आहे.
या कारवाईच्या विशेष मोहिमेसाठी पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाºयांचे पथकही तयार करण्यात आले आहे. या पथकातील कर्मचाºयांकडून उघड्यावर कचरा टाकताना कोणी आढळला की त्याला पकडून त्याचक्षणी शंभर ते दीडशे रुपयांची दंडाची पावती दिली जात आहे. जानेवारीपासून ते आतापर्यंत साडेचार हजार तीनशे रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.
पालिकेच्या या पथकाकडून तीन महिन्यांमध्ये हजारो लोकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा केल्याप्रकरणी दोषी धरत प्रत्येकी शंभर ते दीडशे रुपयांचा दंडही केला आहे.सध्या या पथकाकडून शहरातील प्लास्टिक पिशव्या वापरणाºया विक्रेते व व्यापाºयांवर कारवाईची मोहीम राबविली जात आहे. या उघड्यावर कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात एक मुकादम व त्याच्या हाताखाली दोन कर्मचारी अशी तिघांचे पथक तयार करण्यात आले आहे.
तीन महिन्यांत चार हजार रुपयांचा दंड
शहरातील कचºयाचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. घराघरांमध्ये डस्टबीनचेही वाटप करण्यात आले आहे. तरीही उघड्यावर कोणी कचरा टाकताना आढळल्यास त्यास तत्काळ दंडही केला जात आहे. तीन महिन्यांमध्ये संबंधितांवर कारवाई करीत त्यांच्याकडून चार हजार तीनशे रुपये दंडही आकारण्यात आला आहे, असे कºहाड पालिकेचे आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांनी सांगितले.
शहरातून एकत्र होणाऱ्या कचºयामध्ये प्लास्टिक कचºयाचे प्रमाण अधिक असते. सध्या हे प्लास्टिकचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. उघड्यावर कचरा टाकणाºयांस दंड केला जात असल्याने यातून त्यांची उघड्यावर कचरा टाकण्याची सवय कमी होईल, हे निश्चित.
- जालिंदर काशीद, अध्यक्ष, एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब, कऱ्हाड