कऱ्हाड : भाजप विरोधात राष्ट्रवादीचे मौनव्रत : महात्मा गांधीजींची सरकारला अ‍ॅलर्जी असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 05:57 PM2018-10-02T17:57:22+5:302018-10-02T18:07:18+5:30

भाजप सरकारने खोटी आश्वासने देऊन सर्वांचीच फसवणूक केली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या फसव्या धोरणामुळे समाजाची सामाजिक व आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. सध्या महात्मा गांधीजी यांच्या विचारांची व त्यांची भाजप सरकारला

Karhad: NCP's silent struggle against BJP: Mahatma Gandhi's government accused of being allergic | कऱ्हाड : भाजप विरोधात राष्ट्रवादीचे मौनव्रत : महात्मा गांधीजींची सरकारला अ‍ॅलर्जी असल्याचा आरोप

कऱ्हाड : भाजप विरोधात राष्ट्रवादीचे मौनव्रत : महात्मा गांधीजींची सरकारला अ‍ॅलर्जी असल्याचा आरोप

Next

कऱ्हाड  : भाजप सरकारने खोटी आश्वासने देऊन सर्वांचीच फसवणूक केली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या फसव्या धोरणामुळे समाजाची सामाजिक व आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. सध्या महात्मा गांधीजी यांच्या विचारांची व त्यांची भाजप सरकारला अ‍ॅलर्जी आहे, असा आरोप करीत म्हणून तर त्यांनी स्वच्छ भारतच्या सिम्बॉलमध्ये गांधीजी यांचा उल्लेख केला नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने पदाधिकाºयांनी मंगळवारी कºहाड येथील कोल्हापूर नाक्यावर मौनव्रताने आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते, कºहाड उत्तर अध्यक्ष देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील-वाठारकर, प्रदेश प्रतिनिधी अ‍ॅड. राजाभाऊ पाटील-उंडाळकर, दक्षिण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण, दक्षिण तालुकाध्यक्ष संतोष पाटील, महिला आघाडी कºहाड उत्तर अध्यक्षा प्रभावती माळी, दक्षिण अध्यक्षा नीता मोहिते यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

सकाळी दहा ते साडेबारा या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी मौनव्रत ठेवून आंदोलन केले. तत्पूर्वी कोल्हापूर नाक्यावर असलेल्या महात्मा गांधीजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सर्व पदाधिकाºयांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कºहाड येथील कोल्हापूर नाक्यावर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, अविनाश मोहिते, राजाभाऊ उंडाळकर, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Karhad: NCP's silent struggle against BJP: Mahatma Gandhi's government accused of being allergic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.