कऱ्हाडला इनरव्हील क्लबतर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:26 AM2021-07-10T04:26:35+5:302021-07-10T04:26:35+5:30
कऱ्हाड : येथील इनरव्हील क्लबतर्फे डॉक्टर, सीए आणि कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोनामध्ये जीवाची पर्वा न ...
कऱ्हाड : येथील इनरव्हील क्लबतर्फे डॉक्टर, सीए आणि कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोनामध्ये जीवाची पर्वा न करता रुग्णांसाठी धडपडणाऱ्या डॉक्टरांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. अर्चना अवताडे, विद्युलता पुराणिक, अस्मिता फासे, राहुल फासे, संतोष टकले, संदीप काशीद, रामस्वरूप सिकची, सारिका सिकची, पी. एल. कुलकर्णी, सागर देवाडिगा, समीर पाटील, निखील ओसवाल, सत्यरूप देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी क्लबच्या अध्यक्ष मंजुषा इंगळे, उपाध्यक्ष सीमा पुरोहित, नम्रता कंटक, प्रियांका कांबळे, अर्चना अवताडे, रूपाली डांगे, रेखा काशीद, संगीता पालकर, लक्ष्मी सिकची, लीला सिकची आणि अनुराधा टकले उपस्थित होत्या.
म्होप्रे येथे रस्ता काँक्रिटीकरणास प्रारंभ
तांबवे : म्होप्रे (ता. कऱ्हाड) येथे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून समाजकल्याण योजनेंतर्गत बेघर वसाहतीमध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, पंचायत समिती सदस्य सविता संकपाळ यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कऱ्हाडात बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन उत्साहात
कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयात बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. शिवणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अॅड. रवींद्र पवार, प्राचार्य मोहन राजमाने, अॅड. सदानंद चिंगळे, जितेंद्र डुबल, माजी जीमखाना प्रमुख उपस्थित होते. आर. वाय. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. जीमखाना प्रमुख प्रा. विद्या पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
गोंदी येथे रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था
कऱ्हाड : गोंदी (ता. कऱ्हाड) येथे फाट्यापासून गावापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत तसेच ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. बांधकाम विभागाकडून रस्त्याची देखभाल व दुरुस्ती रखडली आहे. त्यामुळे रस्त्याला कोणीही वाली उरलेला नाही. या रस्त्याने वाठारकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. रहदारीच्या रस्त्याची ही अवस्था असल्याने चालकांची जीवघेणी कसरत होत असून, रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.