कऱ्हाडात धुमश्चक्री

By admin | Published: January 24, 2017 11:07 PM2017-01-24T23:07:45+5:302017-01-24T23:07:45+5:30

२३ जणांवर गुन्हा : पोलिसांसमोरच नगरसेवकासह जमावाची मारामारी; काहीकाळ तणाव

Karhadat Dhumashchri | कऱ्हाडात धुमश्चक्री

कऱ्हाडात धुमश्चक्री

Next

कऱ्हाड : खुन्नस दिल्याच्या कारणावरून नगरसेवकासह जमावाने पोलिसांसमोरच राडा केला. जमावातील युवकांनी एकमेकांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली. यामध्ये एकजण जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत तेवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, नगरसेवकासह काहीजण पसार झाले आहेत.
नगरसेवक मोहसिन अख्तर आंबेकरी, मुसद्दीक अख्तर आंबेकरी, सद्दाम अख्तर आंबेकरी, इस्माईल हसन मुल्ला, दाऊद बादशहा मुल्ला, आबू हसेन मुल्ला, असद कदीर सलाती, जुबेर राजू शेख, अहमद अब्दुलगणी मुल्ला, अश्पाक मस्जीद सलाती (सर्व रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड), मतीन मुश्ताक मोमीन (रा. त्रिमूर्ती कॉलनी, कार्वेनाका, कऱ्हाड), समशेर नवाज शेख (रा. सुमंगलनगर, कार्वेनाका, कऱ्हाड), मन्सूर इस्माईल मुल्ला, सद्दाम मन्सूर मुल्ला (दोघेही रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड), छोट्या इस्माईल पठाण, तौफीक आयुब मुल्ला, अमिर रेहमान मुल्ला, सुहेल अमिर मुल्ला, टिपू इक्बाल शेख, अर्जद फिरोज मुल्ला, बबलू अस्लम मुल्ला, शरीफ मुबारक मुल्ला, कादर नाईकवडी (रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुजावर कॉलनीत गांडूळ खत प्रकल्पासमोर मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन गटांत वादावादी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यांनी याबाबतची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कॉन्स्टेबल राजेंद्र पाटोळे, नितीन येळवे व राजगे यांना देऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस पथक मुजावर कॉलनीत पोहोचले. त्यावेळी नगरसेवक मोहसिन आंबेकरी यांच्यासह सुमारे २५ जणांचा जमाव एकमेकाला शिवीगाळ, दमदाटी करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही दोन्ही गटांतील युवक एकमेकांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करीत होते. जमावजास्त असल्यामुळे पोलिस पथकाने याबाबतची माहिती पोलिस ठाण्यात देऊन अधिक बंदोबस्ताची मागणी केली. त्यानुसार काही वेळातच आणखी पोलिस कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. तोपर्यंत दोन्ही गटांनी एकमेकांना लाथाबुक्क्याने मारहाण सुरू केली.
जादा पोलिस बंदोबस्त पोहोचताच मोहसिन आंबेकरी यांच्यासह काहीजण तेथून पसार झाले. तर अन्य काहीजणांची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणले. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र मानसिंग पाटोळे यांनी रात्री उशिरा कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नंतर पोलिसच फिर्यादी !
मारामारीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले. तसेच याबाबतची तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही सुरू केली. सुरुवातीला दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल होण्याची चिन्हे होती. मात्र, कोणीही एकमेकाविरोधात तक्रार देण्यास पुढे आले नाही. अखेर रात्री उशिरा पोलिसच या प्रकरणात फिर्यादी झाले. पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण २३ जणांवर गुन्हा दाखल केला.

Web Title: Karhadat Dhumashchri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.