कऱ्हाडला ‘सखीं’ची नोंदणी लवकरच

By Admin | Published: February 13, 2015 12:01 AM2015-02-13T00:01:58+5:302015-02-13T00:50:19+5:30

लाभ घेण्याचे आवाहन : नवीन वर्षात होणार बक्षीसांची लयलूट

Karhad's 'Sakhi' registration soon | कऱ्हाडला ‘सखीं’ची नोंदणी लवकरच

कऱ्हाडला ‘सखीं’ची नोंदणी लवकरच

googlenewsNext

कऱ्हाड : महिलांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सखी मंच’ने नववर्षात दमदार पदार्पण केले असून, यावर्षीची कऱ्हाडची सदस्य नोंदणी लवकरच होणार आहे. अनेक दिवसांपासून नोंदणीसाठी महिलांची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना ‘सखी मंच’ने यावर्षी सखींसाठी वेगवेगळ्या भेटवस्तूंचा खजिना आणला आहे. सभासद नोंदणी केवळ एकच दिवस होणार आहे.
‘लोकमत सखी मंच’ने महिलांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. तब्बल तेरा वर्षे ‘सखी मंच’ महिलांसाठी कार्यरत आहे. या तेरा वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून या मंचने आपली ओळख निर्माण केली आहे. वेगवेगळी बक्षिसे, स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम तसेच समाजोपयोगी उपक्रमामुळे सखी मंचने समाजात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. या वर्षातही ‘सखी मंच’ आपली समाजहिताची व महिला सबलीकरणाची भूमिका कायम ठेवून महिलांच्या मनोरंजनासाठी त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी कार्यरत राहणार आहे.
हे व्यासपीठ म्हणजे असंख्य सखींना मिळालेले एक मुक्त आकाश आहे. येथे प्रत्येक सखीने आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू येथे उलगडले आहेत. तसेच स्वत:चा आत्मविश्वासही वाढविला आहे. तेरा वर्षांत सखी मंचच्या सर्वच सोहळ्यात सातत्याने अग्रभागी असणाऱ्या कऱ्हाडच्या सखींची यावर्षातील प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. लवकरच ‘सखी मंच २०१५’ ची एकदिवसीय सदस्य नोंदणी होणार आहे. यासाठी सदस्य नोंदणी फी ३०० रुपये असणार आहे.
जुन्या व नव्या सर्व सभासदांसाठी नोंदणी शुल्क नेहमीप्रमाणे अगदी कमी म्हणजे, फक्त ३०० रुपये असणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सभासदांना ५०० रुपये किमतीच्या हमखास गिफ्ट, सोबत १०० रुपये किमतीचे ‘माय डाएट बुक’, सुवर्णस्पर्श, जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलर्समार्फत तब्बल १ हजार १०० रुपये किमतीच्या बँगल्स मिळणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Karhad's 'Sakhi' registration soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.