कऱ्हाडला नगरसेवक गटांचा ‘षटकार’ !

By admin | Published: August 29, 2014 09:13 PM2014-08-29T21:13:24+5:302014-08-29T23:14:31+5:30

विधानसभेमुळं बिघडलं : दोन्ही आघाड्यांत धुसफूस

Karjad corporators 'group' Six! | कऱ्हाडला नगरसेवक गटांचा ‘षटकार’ !

कऱ्हाडला नगरसेवक गटांचा ‘षटकार’ !

Next

कऱ्हाड : पालिकेच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी आमदार बाळासाहेब पाटील गटाची सत्ता आली़ मुख्यमंत्री समर्थकांना विरोधी बाकावर बसावं लागलं़ त्यामुळे पालिकेत सत्ताधारी आणि विरोधी असे दोनच गट दिसत होते; पण विधानसभेचे पडघम वाजायला लागताच सध्या अनेकांच्या अंगात आले असून, ‘एक एकसे भले दो... दो से भले तीन’ नव्हे तर चक्क सहा गट पडले आहेत. राजकीय वर्तूळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे़
निवडणुकीत मुख्यमंत्री समर्थक यशवंतराव चव्हाण ‘कृष्णा’ आघाडीच्या माध्यमातून ‘जनशक्ती’ समोर गेले़ तर बाळासाहेब समर्थकांच्या लोकशाही आघाडीशी यादवांची विकास आघाडी एकवटली अन् आमदार गटाने २१ जागा मिळवित बाजी मारली तर मुख्यमंत्री समर्थक गटाला आठ जागांवरच नाट लागला़ पालिकेत अडीच वर्षांनंतर नवीन नगराध्यक्ष बदलही बिनविरोध झाला़ मात्र विरोधी नेते पदावरून विरोधकांच्यातच माशी शिंंकली़ त्याला विधानसभा निवडणुकीचे रंग दिसू लागले़
हळूहळू विरोधी आघाडीसह सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांचे रंगही बदलल्याचे दिसत आहे़ विरोधी आघाडीतील नगरसेवक विक्रम पावसकर यांनी भाजप प्रवेश केल्याने नगरसेवक पिता-पुत्रांच्या हातात कमळ दिसू लागले आहे़ महादेव पवार व अन्य एक नगरसेवक डॉक्टरबाबांचे नेतृत्व मानतात, तर शारदा जाधव, स्मिता हुलवान, श्रीकांत मुळे व सहकारी मुख्यमंत्री बाबांबरोबर दिसत आहेत़.असे एकूणच विरोधी आघाडीचे त्रिभाजन दिसतंय़ लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी राष्ट्रवादीतर्फे दक्षिणेवर स्वारीची तयारी चालविल्याने त्यांच्या आघाडीतही धुसफूस वाढली आहे़
माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक जयवंत पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी आघाडीच्या मेळाव्याकडेच पाठ फिरवली आहे. त्यामुळे दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे़
निवडणुकीत लोकशाहीबरोबर तह करणाऱ्या यादवांनी आपल्या विकास आघाडीचे स्वतंत्र अस्तित्व ठेवणार असल्याची भूमिका घेतल्याने पालिकेत सध्या नगरसेवकांचे सहा गट दिसत आहेत़ (प्रतिनिधी)


विरोधी पक्षनेते पदाचा वाद सुरूच अडीच वर्षांनंतर पालिकेत नगराध्यक्ष बदलानंतर विरोधी पक्ष नेते पदाच्याही हलचाली झाल्या. सुरुवातीपसून महादेव पवार यांच्याकडे हे पद आहे; पण, काही नगरसेवकांनी स्मिता हुलवान यांच्या नावाचं पत्र विरोधी पक्षनेते म्हणून प्रशासनाकडे दिल्याने वाद सुरू झाला़ पालिकेच्या एका बैठकीतही त्यावर खरमरीत चर्चा झाली; पण पवार अन् हुलवान यांचा नेतेपदाचा दावा आजही सुरू आहे़ यादव गटाची भूमिका गुलदस्त्यात गुरुवारच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे पाठ फिरवणाऱ्या उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या गटाची भूमिका अद्याप तरीगुलदस्त्यात आहे़ लवकरच यादव गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होऊन त्यात विधानसभेची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे समजते़

Web Title: Karjad corporators 'group' Six!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.