कातरखटावचं केलं कारखटाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:27 AM2021-05-31T04:27:57+5:302021-05-31T04:27:57+5:30

कातरखटाव : प्राथमिक आरोग्य केंद्र, कातरखटाव येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू होते. येथे गर्दी होऊ लागल्याने कात्रेश्वर हायस्कूलमध्ये नागरिकांना ...

Karkhatavacam kela karkhatavam! | कातरखटावचं केलं कारखटाव!

कातरखटावचं केलं कारखटाव!

Next

कातरखटाव : प्राथमिक आरोग्य केंद्र, कातरखटाव येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू होते. येथे गर्दी होऊ लागल्याने कात्रेश्वर हायस्कूलमध्ये नागरिकांना लस देण्यासाठी लसीकरण सत्र चालू केले आहे. गेले पंधरा दिवस या हायस्कूलच्या गेटवर मोठा फलक लावण्यात आला आहे. या बोर्डवर कातरखटाव ऐवजी ‘कारखटाव’ छापण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या गावाचे चुकीचे नाव छापूनसुद्धा बोर्ड दिमाखात लटकवल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.

आजच्या प्रगतशील युगात माणसाकडून चुका होतात; मात्र लगेच सुधारल्या जातात. परंतु, इथे प्राथमिक आरोग्य केंद्र ‘कारखटाव’ करून आपले सहर्ष स्वागत करत आहे, असा मजकूर छापून फलक दिमाखात लटकवला आहे. खालच्या बाजूला या लसीकरणासाठी आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशा यांच्याशी संपर्क साधावा, ‘प्राथमिक आरोग्य केंद्र, कातरखटाव’ असे छापले आहे. म्हणजे लसीकरण ‘कारखटाव’मध्ये आणि लसीकरणासाठी संपर्क ‘कातरखटाव’मध्ये याची खुमासदार चर्चा लस घेण्याऱ्या नागरिकांमधून होऊ लागली आहे.

२९कातरखटाव

कोविड लसीकरण सत्र फ्लेक्स बोर्डवर ‘कातरखटाव’ ऐवजी ‘कारखटाव’ छापल्याचे दिसून येत आहे. (छाया : विठ्ठल नलवडे )

Web Title: Karkhatavacam kela karkhatavam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.