कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:21 AM2021-05-06T02:21:33+5:302021-05-06T02:22:03+5:30
सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली
सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्था, सातारा (स्वायत्त) हे मुख्य महाविद्यालय व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा (स्वायत्त) आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा (स्वायत्त) ही दोन सहभागी महाविद्यालये या तीन अनुदानित महाविद्यालयांचा समावेश असलेले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. एका परिसरातील तीन ते पाच शैक्षणिक संस्थांचे समूह विद्यापीठ तयार करण्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे धोरण आहे.