गुलदार युद्धनौका पर्यटन मंडळाकडे सोपवण्याचा सन्मान माणच्या सुपुत्राला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:53 IST2025-03-03T11:53:05+5:302025-03-03T11:53:44+5:30
नवनाथ जगदाळे दहिवडी : भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे सोपवण्याचा सन्मान माण तालुक्याचे सुपुत्र कारवार ...

गुलदार युद्धनौका पर्यटन मंडळाकडे सोपवण्याचा सन्मान माणच्या सुपुत्राला
नवनाथ जगदाळे
दहिवडी : भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे सोपवण्याचा सन्मान माण तालुक्याचे सुपुत्र कारवार नौदलाचे कॅप्टन जयवंत आनंदराव इंदलकर यांना मिळाला.
गुलदार ही निवृत्त युद्धनौका नौदलाकडून महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे सोपवणारे नौदलाचे कॅप्टन जयवंत आनंदराव इंदलकर हे उकिरडे महिमानगडचे सुपुत्र आहेत. केंद्रीय संघ लोकसेवा आयोगामार्फत नेव्हल एक्झिक्यूटिव्हपदी निवड झालेले जयवंत इंदलकर सध्या नौदलामध्ये कॅप्टन समकक्ष कर्नल या सन्मानाच्या पदावर कारवार येथे कार्यरत आहेत. देशभरातील नौदलाच्या विविध कॅम्पमध्ये जयवंत इंदलकर यांनी आजवर उल्लेखनीय सेवा केलेली आहे.
महाराष्ट्र पर्यटन महामंडळ गुलदार युद्धनौकेचा वापर समुद्राच्या आत मालवणच्या वेंगुर्लाजवळील निवती समुद्रात पाण्याखालील पर्यटन आणि आर्टिफिशियल रिप पर्यटनासाठी करणार आहे. या युद्धनौकेचे प्रमाणित स्कुबा ड्रायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना दर्शन घेता येणार असून पर्यटकांसाठी हे खास आकर्षण असणार आहे.
कॅप्टन जयवंत इंदलकर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, सनदी अधिकारी सुरेश जाधव, माजी अपर राज्यकर आयुक्त विलासराव इंदलकर, मंत्रालय उपसचिव प्रकाश इंदलकर, माजी जॉइंट कमिशनर उत्तमराव इंदलकर, जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर, क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवडचे अध्यक्ष विश्वंभर बाबर, बाळासाहेब पिसाळ यांनी नौदल कॅप्टन जयवंत इंदलकर यांचे कौतुक केले.