कास-ठोसेघरला पर्यटकांचा बहर!

By admin | Published: July 27, 2015 11:02 PM2015-07-27T23:02:34+5:302015-07-27T23:02:34+5:30

ऊन-पावसाचा खेळ : छोट्या-छोट्या धबधब्यांमध्ये भिजण्याचा लुटला मनसोक्त आनंद

Kas-Chosepala tourist growers! | कास-ठोसेघरला पर्यटकांचा बहर!

कास-ठोसेघरला पर्यटकांचा बहर!

Next

सातारा : निसर्गाची मुक्त उधळण, सर्वदूर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोसळणारा जलप्रपात अन् धुक्यात हरवून गेलेली रानवाट. कधी ऊन तर कधी पावसाची रिमझिम असे रम्य वातावरण अनुभवण्याऱ्या पर्यटकांचा जणू कास-ठोसेघरच्या निसर्गरम्य ठिकाणी बहरच आला आहे.सलग आलेल्या सुट्यांमुळे कास, ठोसेघर, सज्जनगड याठिकाणी पर्यटकांनी निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला. कास पठाराबरोबरच कास तलाव, ठोसेघर धबधबा, सज्जनगड या ठिकाणी पर्यटकांनी पावसाच्या सरी अंगावर झेलत निसर्गात भटकंती करण्याचा मनसोक्त आनंद लुटला. सज्जनगड येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे गडाला यात्रेचे स्वरूप आले होते.साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असल्याने ठोसेघरचा धबधबा सुमारे १२०० फुटांवरून ओसंडून वाहत आहे. शनिवार, रविवार आणि आषाढी एकादशीनिमित्त सोमवारीही सुटी मिळाल्यामुळे तीन दिवस याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
ठोसेघर, चाळकेवाडी पठार, चिखली, पांगारे येथील भातशेती, पांगारे धरण परिसरातही पर्यटकांनी निसर्ग भटकंतीचा आनंद घेतला. उरमोडी धरण, सांडवली धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ लागली होती. निसर्गाचा आविष्कार अनेकांनी आपल्या मोबाईल, कॅमेऱ्यात टिपून घेतला. तर काहींनी मनसोक्त धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटला.
पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, नागपूर तसेच कर्नाटक राज्यातूनही पर्यटकांनी हजेरी लावली होती.
बोरणे घाट, यवतेश्वर घाटात छोटे-छोटे धबधबे कोसळत आहेत. यामध्ये चिंब भिजण्याचा आनंद पर्यटकांनी लुटला. (प्रतिनिधी)

Web Title: Kas-Chosepala tourist growers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.