कास पठार खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:41 AM2021-09-26T04:41:52+5:302021-09-26T04:41:52+5:30

अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती चौकट साताऱ्याच्या पश्चिमेस सातारा-कास मार्गावर एकीव फाट्यापासून सह्याद्रीनगर, महाबळेश्वर रस्त्यावरील संपूर्ण पंचक्रोशीचे आराध्य दैवत ...

Kas Plateau Special | कास पठार खास

कास पठार खास

Next

अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती

चौकट

साताऱ्याच्या पश्चिमेस सातारा-कास मार्गावर एकीव फाट्यापासून सह्याद्रीनगर, महाबळेश्वर रस्त्यावरील संपूर्ण पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्रीक्षेत्र मोळेश्वर, ता. जावली पांडवकालीन शिवपार्वतीचे देवस्थान प्रसिद्ध आहे. कित्येक वर्षे ऐतिहासिक वारसा जपत नैसर्गिक विविधतेने नटलेल्या शहराच्या पश्चिमेस कास पठाराच्या कुशीत मोळेश्वर येथील पांडवकालीन शिवपार्वती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी, तसेच कार्तिक शुद्ध एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, तसेच महाशिवरात्रीला गर्दी होत असते.

चौकट : फोटो आहे...

शिवकालीन गोमुख तळे

नजीकच्या शिवकालीन डोंगराच्या माथ्यावर मुबलक प्रमाणात पाणी असणारे नैसर्गिकरीत्या पाण्याचा स्रोत म्हणून गोमुख असणारे जुने तळे आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे येथून संपूर्ण गावाला पाण्याची सोय होत आहे. येथील पाणी कधीही कमी होत नाही.

चौकट फोटो आहे...

वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग

श्री शंकराच्या मंदिरात पार्वतीची प्रतिमा असते; परंतु मोळेश्वर येथील शिवमंदिरात असे दिसून येत नाही. कड्या असलेल्या पांडवकालीन पार्वतीच्या मंदिरात शिवलिंग पाहावयास मिळते. यामध्ये शिवलिंगासारखा जसा ऊर्ध्व भाग असतो. तसा नसतो तर सपाट असे वेगळ्या स्वरूपात पाहावयास मिळते.

Web Title: Kas Plateau Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.