कास पठारावर फुलांची रजई!

By admin | Published: September 6, 2015 10:14 PM2015-09-06T22:14:31+5:302015-09-06T22:14:31+5:30

३२ हजार पर्यटकांची भेट : शनिवार-रविवारच्या सलग सुट्यांमुळे गर्दीत वाढ

Kasai rosa on the plate! | कास पठारावर फुलांची रजई!

कास पठारावर फुलांची रजई!

Next

पेट्री : शहराच्या पश्चिमेला असलेल्या कास पुष्प पठारावर दिवसेंदिवस फुलांचा बहर वाढत असल्याने पठारावर फुलांची रजई अंथरल्यासारखे दृश्य पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून हजारो पर्यटक कास पुष्प पठाराला भेट देत आहेत. या हंगामात आतापर्यंत ३२ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. शनिवार, रविवारच्या सुटीने कास पुष्प पठार पर्यटकांनी बहरत आहे.सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठार हे आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणारे मुख्य पर्यटनस्थळ आहे. यामुळे याचा जागतिक वारसा हक्कच्या यादीत समावेश झाला आहे. या पठारावर राममव्हरी, टूथब्रश, पाचगणी आंब्री, गेन, हनुमान बटाटा, चवरे, कापरू, रांनवांगे, दीपकांडी जयती, निळी आंबळी अशी दहा ते बारा प्रकारांच्या पांढऱ्या फुलांच्या बहरात वाढ होऊ लागली आहे. तसेच पठारावर काही ठिकाणी कंदील पुष्प, जांभळी मंजिरी, मिकी माऊस, सोनकी, तुतारी, सीतेची आसवं, तेरडा, गवती दवबिंदू, ड्रॉसेरा इंडिका, आभाळी, सेरोपेनिया, टोपली, करवी ही फुले या ठिकाणी तुरळक प्रमाणात बहरण्यास सुरुवात झाली आहे. येथील संपूर्ण परिसर मनमोहक बनला असून, पर्यटकांचे लक्ष वेधून घेऊ लागला आहे. यामुळे पर्यटकांची पावले कासकडे वळायला लागले आहेत. तसेच पठारावर मलाबार लार्क पक्षी दिसू लागले आहेत. कण्हेरा वनस्पतीमुळे यंदा तलावात जास्त फुले फुलू लागले आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले तिकडे वळायला लागली आहेत. (वार्ताहर)

Web Title: Kasai rosa on the plate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.