कासचा साकवपूल नावापुरताच, धोक्याची घंटा : पुलावर चढून पर्यटकांचे फोटोसेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:25 PM2018-02-13T13:25:59+5:302018-02-13T13:31:41+5:30

कास तलावाचा संपूर्ण परिसर कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी बहुतांशी पर्यटक तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हकडे जातात. मात्र, या व्हॉल्व्हकडे जाणारा साकवपूल सध्या नावापुरताच उरला आहे. हा पूल पूर्णपणे गंजला असून, काही ठिकाणी निखळलाही आहे. अशा धोकादायक स्थितीत तरुणाईसह पर्यटकांचे या ठिकाणी फोटोसेशन सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.

For Kaskhakakupul Nam, danger bell: Photostation of tourists on the bridge | कासचा साकवपूल नावापुरताच, धोक्याची घंटा : पुलावर चढून पर्यटकांचे फोटोसेशन

कासचा साकवपूल नावापुरताच, धोक्याची घंटा : पुलावर चढून पर्यटकांचे फोटोसेशन

Next
ठळक मुद्देकासचा साकवपूल नावापुरताचधोक्याची घंटा पुलावर चढून पर्यटकांचे फोटोसेशन

पेट्री : कास तलावाचा संपूर्ण परिसर कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी बहुतांशी पर्यटक तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हकडे जातात. मात्र, या व्हॉल्व्हकडे जाणारा साकवपूल सध्या नावापुरताच उरला आहे. हा पूल पूर्णपणे गंजला असून, काही ठिकाणी निखळलाही आहे. अशा धोकादायक स्थितीत तरुणाईसह पर्यटकांचे या ठिकाणी फोटोसेशन सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.

सातारा शहराच्या पश्चिमेकडील कास पठार, बामणोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे म्हणून ओळखली जातात. पावसाळ्यात फुलांच्या हंगामात लाखो पर्यटक पठारावरासह तलावाला देखील भेट देत असतात. सध्या विकेंडला या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे.

काही हौशी पर्यटक तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हवर उभे राहून फोटोसेशन करीत आहेत. मात्र, व्हॉल्व्हकडे जाणारा साकव पूल अखेरची घटका मोजत असून पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उभा असलेला हा लोखंडी पूल बऱ्यांच ठिकाणी मोडकळीस आला आहे. तसेच पूर्णत: गंजलेल्या स्थितीत असलेल्या या साकवचे लोखंडी पायाड काही ठिकाणी निखळून पडले आहेत.

अशा परिस्थितीत कित्येक पर्यटक उत्साहाच्या भरात उडी मारून या व्हॉल्व्हकडे जाण्याचा प्रयत्न करतात. साकवचा अंदाज न आल्यास तोल जाऊन एखादा मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत असून, पालिका प्रशासनाने या पुलाची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.

Web Title: For Kaskhakakupul Nam, danger bell: Photostation of tourists on the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.