पतंगबाजीत नजर हटी दुर्घटना घटी! सातारा इमारतीच्या टेरेसवर चिमुकल्यांच्या थरारक कसरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:03 PM2017-12-15T23:03:26+5:302017-12-15T23:05:31+5:30

सातारा : उंच इमारतीवर मुलांची पतंगबाजी पालकांची डोकेदुखी ठरत आहे. टेरेसवर आपल्याच नादात खेळण्यात व्यस्त असणाºया चिमुकल्यांचा हा खेळ पालकांच्या जिवाला घोर लावणारा ठरतोय.

 Kathagataya sight of accident decreased! Thimble groans of little ones on Satara building terrace | पतंगबाजीत नजर हटी दुर्घटना घटी! सातारा इमारतीच्या टेरेसवर चिमुकल्यांच्या थरारक कसरती

पतंगबाजीत नजर हटी दुर्घटना घटी! सातारा इमारतीच्या टेरेसवर चिमुकल्यांच्या थरारक कसरती

googlenewsNext
ठळक मुद्देधोकादायक स्टंट ठरतायत जीवघेणेपालकांच्या या सूचनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून ही पतंगबाजी होते

सातारा : उंच इमारतीवर मुलांची पतंगबाजी पालकांची डोकेदुखी ठरत आहे. टेरेसवर आपल्याच नादात खेळण्यात व्यस्त असणाºया चिमुकल्यांचा हा खेळ पालकांच्या जिवाला घोर लावणारा ठरतोय. ‘नजर हटी दुर्घटना घटी’ अशी प्रतिक्रिया उंच इमारतीवर खेळणाºया मुलांकडे बघून दिली जाते.

मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते. पण सध्या बाजारपेठेत पतंग दाखल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये पतंग उडविण्याची चुरसच लागली आहे. सकाळी शाळेतून आल्यानंतर दुपारच्या टप्प्यात गटाने टेरेसवर जाऊन हा खेळ सुरू होतो. इमारतीवर असलेल्या सर्वांत उंच ठिकाणी चढून मुलं पतंग उडवतात. या छोट्याशा जागेत त्यांच्याबरोबर त्यांचे मित्रही असतात. पतंग उडविण्याच्या नादात उंचावरून तोल गेला किंवा पाय घसरला तर मोठी दुर्घटना घडू शकते.

पतंग उडवणाºया या शालेय मुलांना खेळताना धोक्याचे भान राहत नाही. खेळायचं म्हणजे जिंकायचं या एकाच उद्देशाने देहभान विसरून ते खेळण्यात दंग होतात. त्यामुळे अपघात आणि त्याचे दुष्परिणाम हे विषय त्यांच्या गावीही नसतात. या संभाव्य धोक्यांची जाणीव असल्यामुळे पालक याविषयी सूचना करत असतात; पण पालकांच्या या सूचनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून ही पतंगबाजी होते. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर न भरणारे नुकसान होण्यापेक्षा वेळेत या मुलांना सावध करून या धोकादायक ठिकाणांपासून परावृत्त करणे गरजेच आहे. धोकादायक पद्धतीने पतंगबाजी करणाºया मुलांना बघेल त्याने हटकण्याची गरज निर्माण झाली आहे.

चायनीज मांज्याची छुपी विक्री!
फलटण तालुक्यात चायनीज मांज्यामुळे एक जणाला प्राण गमवावा लागला होता. तेव्हापासून या मांज्यावर साताºयात बंदी होती. पण पतंग काटायला उत्कृष्ट असलेल्या या मांजाची छुप्या पद्धतीने आणि चढ्या दराने विक्री केली जात असल्याची माहिती उजेडात आली आहे. माणसांसह पक्ष्यांसाठी धोकादायक असलेला हा मांज्या विक्रीसाठी ठेवणाºयांवर कारवाईची मागणी होत आहे.

कटी पतंग धोक्याचीच!
उंच इमारत, झाडे, विद्युत खांब, टॉवर यांपैकी कुठेही जाऊन ही पतंग अडकते. पतंग पटकवण्याच्या एकाच उद्देशाने ही मुलं वाट्टेल ते धोके पत्करायला तयार असतात. पडक्या इमारतीवर चढणे, घरावरून विद्युत खांबावरील पतंग काढणे, झाडावर चढून मांज्याचा गुंता सोडवणे हे प्रकार मुलांकडून केले जातात. पाच आणि दहा रुपयांची पतंग पुन्हा देण्याची ऐपत पालकांची असते; पण केवळ इर्ष्येपोटी पतंग काढण्यासाठी धोके पत्करतात.

नजर वर, भिरकीट खाली!
पतंगबाजी करताना पतंग उंच उडविण्यापेक्षा ती काटण्याकडे मुलांचा कल अधिक असतो. काटलेली पतंग मिळवणं त्यांच्यासाठी ‘प्रेस्टीज पॉर्इंट’ असतो. म्हणून आकाशात नजर आणि भिरकीट पळापळ यांची योग्य कसरत करून ही पतंग पटकवायची असते. पतंग कापणं म्हणजे हरवणं, पतंग लुटणं म्हणजे शौर्य या असल्या भन्नाट कल्पनांनी प्रभावीत होऊन ही चिमुरडी पतंगामागे रस्त्याने सुसाट पळत असतात.
साताºयात इमारतींच्या टेरेसवरील पाईपच्या आधाराने मुलांचे असे चढणे जीवघेणे ठरू शकते.

Web Title:  Kathagataya sight of accident decreased! Thimble groans of little ones on Satara building terrace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.