‘अजिंक्यतारा’चा रस्ता टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:48 PM2018-11-18T22:48:57+5:302018-11-18T22:49:02+5:30

सातारा : इतिहासाची साक्ष देत गेल्या अनेक वर्षांपासून उभा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा रस्ता आता काट टाकणार आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या ...

Katich will cast the path of 'Ajinkya' | ‘अजिंक्यतारा’चा रस्ता टाकणार कात

‘अजिंक्यतारा’चा रस्ता टाकणार कात

googlenewsNext

सातारा : इतिहासाची साक्ष देत गेल्या अनेक वर्षांपासून उभा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा रस्ता आता काट टाकणार आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून १ कोटी २७ लाख ४७ हजार १११ रुपये निधी मंजूर झाला असून, लवकरच रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ होणार आहे.
अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. मात्र, संवर्धनाअभावी या किल्ल्याची दुरवस्था होत चालली आहे. देशभरातील हजारो पर्यटक या किल्ल्याला आवर्जून भेट देतात. मात्र, किल्ल्याकडे जाणारा रस्ताच पूर्णपणे उखडल्याने पर्यटकांना तसेच नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहन किल्ल्यावर नेण्याऐवजी अनेक पर्यटक व नागरिक चालत जाणेच पसंत करतात. रस्त्याकडेला असलेली सुरक्षा रेलिंगही तुटल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत होता.
किल्ल्याचा या परिस्थितीबाबत अनेकदा आवाज उठविण्यात आला. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला.
अखेर शासनाकडून या रस्त्याच्या कामास हिरवा कंदील देण्यात आला. नुकताच या रस्त्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून १ कोटी २७ लाख ४७ हजार १११ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. गोडोली अजिंक्यतारा प्रवेश कमान ते किल्ला प्रवेशद्वार या मार्गाची दुरुस्ती केली जाणार आहे. बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्याचे काम दर्जेदार करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अजिंक्यताºयावरील रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे सातारकरांमधून नाराजी व्यक्त होत होती.
वनविभागाची परवानगी गरजेची
अजिंक्यतारा किल्ल्याचा काहीसा भाग हा वनविभागाच्या हद्दीत आहे. ही बाब बांधकाम विभागाला अडचणीची ठरणार आहे. वनविभागाने परवानगी दिली तरच रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. या कामाचा ठेका घेतलेल्या संबंधित ठेकेदाराला याबाबत सूचना देण्यात आली असून, वनविभागाच्या परवानगी शिवाय कामास प्रारंभ करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
पर्यटकांचा मार्ग सुकर
कास पठार, सज्जनगड, ठोसेघरला भेट देणारे अनेक पर्यटक अजिंक्यतारा किल्ल्याला भेट देतात. परंतु खराब रस्त्यामुळे अनेक पर्यटक किल्ल्यावर येणे टाळतात. रस्त्याचे मजबुतीकरण केल्यानंतर पर्यटकांची सर्वात मोठी अडचण दूर होणार आहे. रस्ता दुरुस्तीनंतर पर्यटनविकासाला चालना मिळणार आहे. पर्यटकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

Web Title: Katich will cast the path of 'Ajinkya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.