काटवलीत जखमी मोराला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:07 PM2018-08-26T23:07:20+5:302018-08-26T23:07:24+5:30

Katiwala wounded Morra alive | काटवलीत जखमी मोराला जीवदान

काटवलीत जखमी मोराला जीवदान

googlenewsNext

पाचगणी : काटवली (ता. जावळी) येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या जखमी मोराला जीवदान दिले. ग्रामस्थांनी या मोराला वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. त्याला पायाला मोठी जखम झाली असून, उपचारानंतर मोराला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काटवली येथील दीपक बेलोशे यांच्या शेतात ग्रामस्थांना एक मोर आढळून आला. मोराला पायाला मोठी जखम झाली होती. ही बाब निदर्शनास येताच नागरिकांनी महाबळेश्वर वनविभागाशी संपर्क साधून अधिकाºयांना याबाबत माहिती दिली.
तोपर्यंत ग्रामस्थांनी जखमी मोराला शेतातून उचलून काटवलीतील पशुसंवर्धन दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने करहर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोळे यांना बोलाविण्यात आले. मोराच्या पायाला वरच्या बाजूला मोठी जखम झाल्याचे दिसून आले.
डॉक्टरांनी या मोरावर प्राथमिक उपचार केले; परंतु त्याला अधिक उपचारासाठी मेढा येथे न्यावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमी मोर वन अधिकाºयांच्या ताब्यात देण्यात आला असून, उपचारानंतर त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. दरम्यान, ग्रामस्थांनी तत्परता दाखविल्याने मोराचे जीव वाचले असल्याने समाधानाचे वातावरण आहे.
उपचारानंतर अधिवासात सोडणार
या परिसरात मोर आणि लांडोरींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे शेतकºयांना मोरांचे दर्शन वारंवार घडत आहे. जखमी मोरावर उपचार केल्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात सोडून देण्यात येणार आहो. त्याच्या प्रकृतीवर वनअधिकारी लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Katiwala wounded Morra alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.