सोबत्याला वाचविल्यानंतरच थांबली ‘काव-काव’!

By admin | Published: November 30, 2015 10:54 PM2015-11-30T22:54:13+5:302015-12-01T00:11:56+5:30

पक्ष्यांची युक्ती फळास : मांजात अडकलेल्या कावळ्याची केली सुटका

'Kav-Kav' stopped after saving the spouse! | सोबत्याला वाचविल्यानंतरच थांबली ‘काव-काव’!

सोबत्याला वाचविल्यानंतरच थांबली ‘काव-काव’!

Next

सातारा : वेळ दुपारी एकची. सदर बझार येथील एका बंगल्याच्या आवारातील एका झाडाभोवती सुरू होती कावळ्यांची काव-काव. जणू ते मागत होते मदतीचा हात... कारण त्यांचा एक सोबती झाडावर लटकलेल्या पतंगाच्या माज्यात अडकून सुटकेसाठी फडफडत होता. जिवाच्या आकांतानं ओरडत होता. अचानक झालेल्या कावळ्यांच्या आवाजानं तेथेच काम करत असलेल्या काही कामगार युवकांनी झाडाकडे धाव घेतली अन् प्रयत्न करून मांज्यातून कावळ्याची सुटका केली.पक्ष्यांमध्ये कावळा बुद्धिमान म्हणून ओळखला जातो. म्हणूनच मांज्यात अडकलेल्या आपल्या सोबत्याला वाचविण्यासाठी त्यांनी काव-काव करून माणसाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हुशार कावळ्यांनी आपल्या सोबत्याला वाचविण्यासाठी केलेली युक्ती फळास आली, अशीच चर्चा हा प्रकार पाहणाऱ्यांमध्ये सुरू होती.सदर बझार येथील पाटील बंगल्याच्या आवारातील चिंचेच्या झाडावर लटकलेल्या मांज्यात मंगळवारी दुपारी एक कावळा अडकला होता. त्याने सुटकेसाठी प्रयत्न केला; पण तो मांज्यात जास्तच अडकत गेला. सुटका होत नसल्यामुळे त्याने काव-काव करून आपल्या सोबत्यांना बोलावले अन् काही वेळातच कावळ्यांचे थवेच्या थवे झाडाभोवती घिरट्या घालत ओरडू लागले. आसपासच्या घरांवरही कावळ्यांचे थवे बसले होते. दरम्यान, अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांच्या बंगल्यात प्लंबिंकचे काम करत असलेले अमन संदे, बबलू बागवान, तन्वीर बागवान, आकीब शेख या कामगारांनी प्रयत्न करून अडकेल्या कावळ्याची सुटका केली. त्याला सोडल्यानंतर काही क्षणातच इतर कावळ्यांची काव-काव थांबली अन् आपल्या सोबत्याला सुखरूप पाहून कावळ्यांचे थवे उडून गेले. (प्रतिनिधी)


कावळ्याच्या सुटकेसाठी चौघांचे तासभर प्रयत्न
कावळ्यांचा गोंधळ ऐकून जवळच प्लंबिंगचे काम करणाऱ्या कामगारांनी झाडाकडे जाऊन पाहिले असता उचं ठिकाणी मांज्यात अडकलेला कावळा त्यांना दिसला. झाडावर चढून कावळ्याची सुटका करणे अवघड होते, त्यामुळे कामगारांनी लिंबदोरच्या साह्याने मांजा तोडला. त्यामुळे कावळा थोडा खाली आला. त्यानंतर लोखंडी पाईपने त्याला हळूहळू खाली खेचले. हा प्रकार सुरू असताना इतर पक्ष्यांचा किलबिलाट वाढला होता. एक तासाच्या प्रयत्नानंतर अडकलेल्या कावळ्याला पिशवीने पकडून त्याच्या पंखात अडकलेला मांजा कटरने अन् कावळ्याने आकाशी भरारी घेतली.

Web Title: 'Kav-Kav' stopped after saving the spouse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.