कवठेच्या संघर्ष क्लबची संगमेश्वरवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:36 AM2021-04-13T04:36:49+5:302021-04-13T04:36:49+5:30
महाराष्ट्र व रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या सहकार्याने व विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट स्पोर्ट्स अकॅडमी रत्नागिरी यांच्या वतीने या ...
महाराष्ट्र व रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या सहकार्याने व विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट स्पोर्ट्स अकॅडमी रत्नागिरी यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कवठेतील संघर्ष क्लब व रत्नागिरीतील संगमेश्वर संघात अटीतटीचा सामना होऊन संघर्ष क्लबने विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पार्थ कळसकर व उत्कृष्ट आक्रमक म्हणून आदित्य साळुंखे यांची निवड झाली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत पुणे, मुंबई, ठाणे, वाळवा, कुपवाड, विटा, सोलापूर, रत्नागिरी, भडकंबे, शिवनगर आदी प्रमुख संघांबरोबर अन्य सुमारे २५ संघ सहभागी झाले होते.
विजयी संघास संदीप तावडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा खो-खो अमॅच्युअर असोसिएशनचे सरचिटणीस महेंद्र गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती. संघनायक श्रेयस चव्हाण, पार्थ कळसकर, विजय चव्हाण, आदित्य साळुंखे, प्रवीण यादव, गणेश साळुंखे, रितेश जाधव, रेवणनाथ यादव, सागर मसुगडे, संकेत गुरव, पीयूष चव्हाण, आर्यन माने, वेदांत साळुंखे व सार्थक केंजळे या खेळाडूंनी नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन घडवत चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. खेळाडूंना कोच लखन साळुंखे, शशिकांत चव्हाण, ऋषिकेश यादव, दत्तात्रय कमाने, स्वप्नील साळुंखे, संजय साळुंखे, प्रसाद साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.
- चौकट
गावात संघाचे जल्लोषात स्वागत
विजयी संघाचे कवठे नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. खेळाडू व मार्गदर्शकांचे कवठे, नवीन कवठे, केंजळ येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, शाम-शरद शिक्षण प्रसारक संस्थेचे ज्योतिर्लिंग विद्यालय, ग्रामस्थ तसेच क्रीडाप्रेमींच्या वतीने सत्कार करण्यात आला.
फोटो : १२केआरडी०१
कॅप्शन : कवठे, ता. कऱ्हाड येथील संघर्ष क्लबने डेरवणमध्ये झालेल्या खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले.