दाट धुक्यात हेडलाईट ठेवा सज्ज!

By admin | Published: July 4, 2017 01:42 PM2017-07-04T13:42:38+5:302017-07-04T13:42:38+5:30

कास पठारावर पर्यटकांची रेलचेल वाढली; वाहनांचे अपघात होण्याची शक्यता

Keep Ready Headlight in Dense Fog! | दाट धुक्यात हेडलाईट ठेवा सज्ज!

दाट धुक्यात हेडलाईट ठेवा सज्ज!

Next



आॅनलाईन लोकमत

पेट्री (जि. सातारा) , दि. 0४ : जागतिक वारसा स्थळ व आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणारे कास पठार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात असून, हा परिसर संपूर्ण हिरवाईने नटला असून, सर्वत्र आल्हाददायक वातावरण पाहता तसेच ठिकठिकाणी फेसाळणारे धबधब्याचे नयनरम्य दृश्याचा स्वानुभव घेण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू आहे. तसेच सध्या शहराच्या पश्चिमेस दिवसभर दाट धुके असून, समोरून आलेली वाहने दिसत नसल्याने आपापल्या वाहनांची हेडलाईट सुरू आहे नाही, हे पाहणे अत्यावश्यक आहे. हेडलाईट सुरू असण्याअभावी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सातारा शहराच्या पश्चिमेस सातासमुद्रापार ओळख नेणारे कास पठार परिसरात गुलाबी थंडीचा आस्वाद तसेच सध्या सर्वत्र हिरवाईने नटलेले त्यातच सड्यावर ठिकठिकाणी नागमोडी वळणाने वाहणारे पाणी, भारतातील सर्वाधिक उंचीचा तीन टप्प्यांत कोसळला जाणारा वजराई धबधबा, अन्य इतर दूंद, एकीवसारखे कित्येक कोसळले जाणारे छोटे-मोठे धबधबे, सांडव्यावरून पाणी वाहत नयनरम्य नजराणा देणारा कास तलाव, तसेच कास -बामणोली परिसरातील मनाला मोहिनी घालणारे सर्वत्र निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत आहे. तसेच सुटीच्या दिवशी शेकडो वाहनांची वर्दळ या परिसरात चालू आहे.

सातारा-कास-बामणोली मार्गावर ठिकठिकाणी धोकादायक वळणे असून, सध्या या परिसरात दाट धुक्याच्या दुलईसह बऱ्याचदा मुसळधार पाऊस पडत आहे. दिवसभर असणाऱ्या या दाट धुक्यात समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज यावा, यासाठी पर्यटकांनी आपल्या वाहनांची हेडलाईट सुरू करण्यासंदर्भात सावधान असणे अत्यावश्यक आहे. कारण कित्येकदा वाहनांची हेडलाईट सुरू नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. यामुळे अपघात होऊन एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरात फिरायला येणाऱ्यांनी आपापल्या वाहनांची हेडलाईट सुरू आहे की नाही, याची तपासणी करणे आवश्यक आहे.

बऱ्याचदा हेडलाईट सुरू नसल्याने समोरून येणारे दुसरे एखादे वाहन अगदी जवळ आल्यावर समजते. दरम्यान, वाहनांवर नियत्रंण ठेवणे अवघड जाते. तसेच ऐन वेळेस हेडलाईट सुरू असण्याअभावी समोरून आलेल्या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात टाळता यावा, यासाठी वाहने रस्त्याकडेला घ्यावे तर रस्त्यालगत झाडांचा पालापाचोळा कुजून पडलेला असून, घसरट निर्माण झाली आहे. तसेच लाल मातीवरून वाहन घसरण्याची शक्यता अधिक आहे.



पोलिसांची हवी करडी नजर


सध्या कास पठार परिसरात फिरायला येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दिवसभर पावसाची रिमझिम त्यात दाट धुक्याची दुलई पाहता दूरवरून समोरून वाहन दिसत नाही. त्यात स्टंट अथवा हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून मोठ्या वेगाने वाहने चालविली जात असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची कायमस्वरूपी करडी नजर असणे अत्यावश्यक आहे.


आपल्या चुकीमुळे समोरून येणाऱ्या वाहनाला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये, तसेच भविष्यात अपघातासंबंधीची दुदैर्वी घटना टळावी, यासाठी वाहनचालकांनी दाट धक्यातून प्रवास करताना आपापल्या वाहनांची हेडलाईट दिवसा देखील सुरू ठेवणे आवश्यक आहे.
- संस्कार मोहिते,
पर्यटक ठाणे

Web Title: Keep Ready Headlight in Dense Fog!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.