अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधानाशी बेईमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:44 PM2018-10-14T22:44:04+5:302018-10-14T22:44:16+5:30

सातारा : ‘या जगात टिकून राहायचे असेल तर अंधश्रद्धा हद्दपार करणे गरजेचे असून, अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधनाशी बेईमानी आहे,’ ...

To keep superstition is the dishonesty of the Constitution | अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधानाशी बेईमानी

अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधानाशी बेईमानी

Next

सातारा : ‘या जगात टिकून राहायचे असेल तर अंधश्रद्धा हद्दपार करणे गरजेचे असून, अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधनाशी बेईमानी आहे,’ असे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे व्यक्त केले.
सातारा नगरपालिकेतर्फे देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृृती सामाजिक पुरस्कार अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना शाहू कला मंदिर येथे प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते आणि खासदार उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, सुजाता राजेमहाडिक, स्मिता घोडके, अमोल मोहिते, विनोद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सातारी कंदी पेढे असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाच्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. काकोडकर पुढे म्हणाले, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी ‘अंनिस’च्या माध्यमातून सर्व जगाला मोठा मंत्र दिला आहे. त्यांच्या विचारामध्ये समाजाला घडविण्याची क्षमता आहे.’
ज्येष्ठ विचारवंत व शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर म्हणाले, ‘नरेंद्र दाभोलकरांनी विवेकाची वाटचाल सुरू ठेवली आहे. ती आजतागायत सुरू आहे.’ खासदार उदयनराजे म्हणाले, ‘डॉ. दाभोलकरांची आजही उणीव भासत आहे. ते चांगले खेळाडूही होते. विचारांची लढाई त्यांनी विचाराने लढली. त्यांचे कार्य आपण सर्वांनी समाजापुढे न्यावे.’
दाभोलकरांचे कार्य प्रत्येकाने पुढे न्यावे
ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, ‘जग अत्यंत वेगाने पुढे चालले आहे. वेगवेगळी आव्हाने उभी ठाकली जात आहेत. शंभर वर्षांत जेवढी स्थित्यांतरे घडली नाहीत, तेवढी केवळ गेल्या दहा वर्षांत घडली आहेत. इतक्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात माणसाची विचार करण्याची क्षमता मजबूत नसेल तर समाज व्हावत जाईल, अशी भीती व्यक्त केली. तसेच डॉ. काकोडकर यांनी दाभोलकरांचे कार्य पुढे नेण्याचे आवाहन यावेळी केले.

Web Title: To keep superstition is the dishonesty of the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.