रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करा, सांगली महापालिकेवर कामगारांचा मोर्चा
By शीतल पाटील | Published: February 28, 2023 06:05 PM2023-02-28T18:05:56+5:302023-02-28T18:06:18+5:30
सांगली : महापालिकेकडील मानधन बदली रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करावे या मागणीसाठी कामगार सभेच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला ...
सांगली : महापालिकेकडील मानधन बदली रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करावे या मागणीसाठी कामगार सभेच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला महापालिका कामगारांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला. उपायुक्त राहूल रोकडे यांच्या आश्वासनानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महापालिकेने १९ ऑक्टोंबर २०२२ च्या महासभेत बदली मानधन रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा ठराव केला आहे. या ठरावाच्या अनुषंगाने राज्य शासनाला सुस्पष्ट अहवाल पाठवण्यात यावा. नगर विकास खात्याने १४ फेब्रुवारी २०२३ रोजी महापालिकेच्या ५८६ रिक्त जागेवर नोकर भरतीस परवानगी दिली आहे. या जागांवर मानधन बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता यादीनुसार भरती करण्यात यावी.
नुकत्याच मंजूर झालेल्या आकृतीबंधात राज्य शासनाने आरोग्य विभागाकडे सफाई कर्मचारी व वाहन चालकांना नाकारले आहे. ही कृती चुकीची असून साफसफाई कर्मचारी व वाहन चालकांची पदे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवावा. आकृतीबंधात मंजूर १११४ पदासाठी कर्मचारी नियुक्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. आदि मागण्या करण्यात आले आहेत.
या मोर्चात कामगार सभेचे अध्यक्ष तानाजी पाटील, कार्याध्यक्ष अनिल ठाकर, सहसचिव विजय तांबडे, विनायक माने, रणजीत केंचे, जयश्री वळला रुस्तुम नदाफ गीताताई ठाकर अस्लम महात, नईम नायकवडे आदिसह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या