ज्ञानेश्वरी पारायणात सहभागी वाचकांना किटली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:49 AM2021-02-20T05:49:30+5:302021-02-20T05:49:30+5:30
कोपर्डे हवेली : अलीकडच्या काळात धावपळीच्या युगात वाचन संस्कृतीची जोपासना मर्यादित लोक करत आहेत. त्यामध्ये वाढ होण्यासाठी कोपर्डे हवेली, ...
कोपर्डे हवेली :
अलीकडच्या काळात धावपळीच्या युगात वाचन संस्कृतीची जोपासना मर्यादित लोक करत आहेत. त्यामध्ये वाढ होण्यासाठी कोपर्डे हवेली, तालुका कराड येथे ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्यात संसार उपयोगी किटली, कुकर या साहित्याचे वाटप वाचकांना करण्यात आले.
येथील ग्रामस्थांच्या वतीने गेल्या पन्नास वर्षांपासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये हरिपाठ ,प्रवचन, काकडा, कीर्तन आदी कार्यक्रम असतात. तर सकाळी सात ते अकरापर्यंत ज्ञानेश्वरीचे वाचन केले जाते. यावेळी महिला, युवक, पुरुष सहभागी होतात. पारायणाची सांगता दुपारच्या काल्याच्या कीर्तनाने केली जाते.
अलीकडच्या काही वर्षात धावपळीच्या युगात अनेकजण वाचनापासून दूर जाऊ लागले आहेत. वाचन वाढल्याने माणूस सुसंस्कृत बनतो हाच उद्देश समोर ठेवून काॅम्रेड गणेश चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाचन संस्कृतीत वाढ होण्यासाठी घरगुती वापरासाठी प्रत्येक वाचकास किटली भेट दिली. तर वाचकांतून लकी ड्रॉ काढून यशस्वी विजेत्याला चांगल्या कंपनीचा कुकर देऊन सन्मानित करण्यात आले.
फोटो ओळ : कोपर्डे हवेली येथे ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्यात वाचकास किटली भेट देण्यात आली.