फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भातील खा. रणजितसिंह यांच्या मागण्या पूर्ण करणार - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 08:21 PM2023-01-27T20:21:44+5:302023-01-27T20:22:22+5:30

फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्या संदर्भातील खा. रणजितसिंह यांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले. 

  Kha in reference to the road passing through Phaltan city. Nitin Gadkari said that he will fulfill the demands of Ranjit Singh   | फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भातील खा. रणजितसिंह यांच्या मागण्या पूर्ण करणार - नितीन गडकरी

फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भातील खा. रणजितसिंह यांच्या मागण्या पूर्ण करणार - नितीन गडकरी

googlenewsNext

नसीर शिकलगार
फलटण: खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातून जाणाऱ्या पालखी मार्ग संदर्भात आणि विमानतळावरील हवाई पट्टी संधर्भात तसेच फलटण ते सांगली रस्त्यांच्या संदर्भात केलेल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा शब्द देत असून नवीन मुंबई ते बंगलोर हायवे मुळे फलटणहून मुंबईला तीन तासात पोहोचता येईल अशी ग्वाही केंद्रीय सडक परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली फलटण शहरातील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर नितीन गडकरी यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे तसेच उंडवडी कडेपठार बारामती फलटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन शिंदेवाडी भोर वरणघाट रस्त्याचे रुंदीकरण आणि लोणंद ते सातारा रस्त्याच्या मजबुती करण्याच्या शुभारंभ प्रसंगी नितीन गडकरी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर खा श्रीनिवास पाटील ,विधान परिषदेचे माजी सभापती आ रामराजे नाईक निंबाळकर ,आ शहाजीराव पाटील ,आ दीपक चव्हाण ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिजामाला नाईक निंबाळकर ,समशेरसिंह नाईक निंबाळकर, सचिन बेडके, जयकुमार शिंदे, जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख आदी उपस्थित होते माझे गाव तसेच मी वारकरी संप्रदायाशी निगडित असून माझ्याही गावाला प्रति पंढरपूर असे म्हटले जाते ज्यावेळी आळंदीहून पंढरपूरला वारकरी पायी जात असतात त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊनच आम्ही आळंदी ते पंढरपूर रस्त्याचे चौपदरीकरण आधुनिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या तीन महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण करून हा रस्ता वारकऱ्यांसाठी सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

 खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या दृष्टीने फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्या संदर्भात जी रुंदीकरणाची आणि मजबुती करण्याची मागणी केली आहे ती मागणी तातडीने पूर्ण करणार आहे असे  गडकरी यांनी स्पष्ट केले त्याचप्रमाणे माझ्या खात्यामधील रस्त्यांच्या संदर्भामध्ये ज्या ज्या मागण्या खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केल्या आहे त्या शंभर टक्के पूर्ण करणार आहे मी ज्यावेळेस शब्द देतो तो शब्द पाळत असतो त्यामुळे मी दिलेला शब्द पूर्ण होणार आहे त्याची काळजी फलटणकरानी करू नये असे सांगतानाच नवीन मुंबई ते बंगळुरू या नवीन रस्त्यामुळे फलटण ते मुंबई हे अंतर तीन तासात पार करता येईल इतके चांगले काम नवीन रस्त्याचे होईल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली.

खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आळंदी ते पंढरपूर मार्गाची चौपदरीकरणाचे मागणी नितीन गडकरी यांनी पूर्ण केल्याबद्दल आभार मानून फलटण ते बारामती या रस्त्याचे चौपदरीकरण तसेच फलटण ते दहिवडी रस्त्याचे रुंदीकरण करण्याबरोबरच नाईकबोमवाडी येथे होणाऱ्या नवीन औद्योगिक वसाहतीला नवीन पालखी मार्ग जोडावा अशी मागणी केली ज्या ज्या वेळी मी माढा लोकसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामासंदर्भात नितीन गडकरींना भेटलो व कामे सांगितली ती कामे त्यांनी शंभर टक्के पूर्ण केली असून जवळपास एक लाख कोटी रुपयांचा निधी नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामासाठी खर्च होत असल्याचे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

फलटणला जोडणारे अनेक रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जात असल्याने विकास कामाचा मोठा डोंगर या तालुक्यात उभा राहणार असून अनेक मोठे उद्योगधंदे येणार आहेत याचे सर्व श्रेय नितीन गडकरी यांनाच आहे असे सांगून खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपण राजकारणावर सध्या काही बोलणार नाही मात्र ज्यावेळी राजकीय आखाड्यात उतरू त्यावेळी मात्र राजकारणावर बोलू असे स्पष्ट केले आ रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात आज आपण साताराहून मुंबईला ज्या एक्सप्रेस हायवेमुळे चार तासात पोचतो याचे श्रेय नितीन गडकरी यांना असून पक्ष, जात पात न बघता किंवा कोणतेही राजकारण न आणता नितीन गडकरी यांनी विकासाची कामे केल्याचे गौरवोद्गार रामराजेनी काढले कार्यक्रमाचे चांगले नियोजन केल्याबद्दल खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेही कौतुक रामराजे यांनी करताना भांडायचे वेळेस भांडू राजकारण करू पण आत्ता ही वेळ नसल्याचे सांगितले


 

Web Title:   Kha in reference to the road passing through Phaltan city. Nitin Gadkari said that he will fulfill the demands of Ranjit Singh  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.