खादी चवताळली... खाकी रक्ताळली!....सातारा राजे संघर्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:49 PM2017-10-06T23:49:43+5:302017-10-06T23:54:04+5:30

सातारा : शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार शिवेंद्रसिंहराजे गुरुवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर दाखल झाल्याची माहिती मिळताच खासदार उदयनराजे यांनी टोलनाक्यावर काही कार्यकर्त्यांना थांबवून आपला मोर्चा साताºयाच्या दिशेने

 Khadi is chaotic ... khaki bloody! .... Satara kings struggle! | खादी चवताळली... खाकी रक्ताळली!....सातारा राजे संघर्ष !

खादी चवताळली... खाकी रक्ताळली!....सातारा राजे संघर्ष !

Next
ठळक मुद्दे साताºयाच्यासाताºयाच्या इतिहासात... ... न भूतो न भविष्यती !आनेवाडी टोलनाका ते सुरुचि बंगला व्हाया विश्रामगृह. .. एक थरारक पाठलाग !शिवेंद्रसिंहराजेंनी गाडी अडवून बंदुकीतून गोळीबार केला...शिवेंद्रसिंहराजेंवर पिस्तूल रोखून उदयनराजेंची ‘खल्लास’ची धमकी

सातारा : शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार शिवेंद्रसिंहराजे गुरुवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर दाखल झाल्याची माहिती मिळताच खासदार उदयनराजे यांनी टोलनाक्यावर काही कार्यकर्त्यांना थांबवून आपला मोर्चा साताºयाच्या दिशेने वळविला. याविषयी माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने उदयनराजेंसह कार्यकर्त्यांच्या वाहनांची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीमुळे खासदारांबरोबरच्या गर्दीची विभागणी झाली. विश्रामगृहात दोन्ही गट परस्परांत भिडले असते तर मोठा अनर्थ झाला असता. आमदार शिवेंद्रसिंहराजे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास शेकडो कार्यकर्त्यांसह विश्रामगृहावर असल्याची माहिती उदयनराजे यांच्या कानी पडल्यानंतर त्यांचा पारा चढला. ‘ए चला रेऽऽ सर्किट हाऊसला’ असे म्हणत गाड्यांचा लवाजमा त्यांच्या मागे गेला. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी याविषयीची माहिती तातडीने मुख्यालयात कळविली. त्यानंतर अन्य ठिकाणी असलेल्या पोलिसांना तातडीने वाढे फाटा येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे उदयनराजेंच्या ताफ्यातील काही गाड्या सोडल्या; पण अन्य गाड्यांना अडवून त्यांची तपासणी करण्यात आली. तपासाच्या निमित्ताने गाड्या अडविल्यामुळे कार्यकर्ते आणि उदयनराजेंच्या गाड्यांमधील अंतर वाढले. उदयनराजे विश्रामगृहावर पोहोचेपर्यंत आमदार आपल्या निवासस्थानी पोहोचले. मागे राहिलेले कार्यकर्ते अद्याप न आल्याने मोजक्याच कार्यकर्त्यांसह खासदार निवासस्थानी भिडले. पोलिसांनी वेळेतच खबरदारी घेऊन नाकाबंदी केली नसती तर दोन्ही राजे गटांचा जमाव पांगवणे पोलिसांना अशक्यप्राय झाले असते.

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा :‘टोलनाक्यावरील वाद उफाळल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी शहारातून फिल्मी स्टाईल गाड्या पळविल्या आहेत. यामध्ये कोण-कोण कार्यकर्ते होते. हे पाहाण्यासाठी पोलिस आमदारांच्या बंगल्यापासून साताºयातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेणार आहे,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, ‘दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडू नयेत म्हणून पोलिसांनी प्रचंड खबरदारी घेतली होती. आनेवाडी टोलनाका ते साताºयापर्यंत पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरेकेट्स लावले होते. सुरुचि बंगल्यावर येईपर्यंत उदयनराजेंना पोलिसांनी चारवेळा आडवले. मात्र, तरीही उदनयनराजे सुरुचिवर पोहोचले; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळल्याचेही पाटील यांनी सांगितले.
पोलिसांनी फायरिंग केले नसून सुरुचिवर ज्यांनी कोणी फायरिंग केले आहे. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. सुरुचि, सर्किटहाऊस, पोवई नाका, राजवाडा परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासणार आहेत. यामध्ये जे कार्यकर्ते दिसतील, त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल, असेही पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
संदीप पाटील म्हणाले, ‘यातील बरेचसे आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये कोणावरही दुजाभाव केला जाणार नाही. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुरुचि बंगला परिसरात बॅरेकेट्स लावण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.

शिवेंद्रसिंहराजेंनी गाडी अडवून
बंदुकीतून गोळीबार केला...

अजिंक्य मोहिते यांच्या तक्रारीत खंदारे अन् राजू यांचा उल्लेख

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जलमंदिरकडे जात असताना शिवेंद्रसिंहराजेंसह आठ ते दहा लोकांनी माझी गाडी सुरुचिजवळ अडविली. शिवेंद्रसिंहराजेंनी बंदूक रोखून खल्लास करणार, अशी धमकी देत बंदुकीतून फायर केले. त्याचवेळी हे फायर मी चुकविल्याने सनी भोसले याच्या गाडीवर लागला, अशी फिर्याद अजिंक्य मोहिते यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
शुक्रवार पेठेतून जलमंदिरकडे जात असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राजू भोसले, फिरोज पठाण, बाळू खंदारे, विक्रम पवार, हरी साळुंखे, दशरथ कांबळे, चेतन सोळंकी, योगेश चोरगे यांच्यासह अन्य लोकांनी माझी गाडी अडवून दमदाटी करण्यास सुरुवात केली. शिवेंद्रसिंहराजेंनी केलेल्या फायर मी चुकविला. त्यामुळे हा फायर सनी भोसलेच्या गाडीवर लागला. बाळू खंदारे व राजू भोसले यांनी सहा राऊंड फायर केले. त्यानंतर तेथून जाताना शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यकर्त्यांनी गाड्या फोडल्या, असेही मोहिते यांनी तक्रारीत म्हटले आहे.

शिवेंद्रसिंहराजेंवर पिस्तूल रोखून उदयनराजेंची ‘खल्लास’ची धमकी
विक्रम पवार यांच्या तक्रारीत सनी अन् अमर यांची नावे
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘सुरुचिवर जात असताना उदयनराजे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझा पाठलाग केला. बंगल्याच्या गेटवर आल्यानंतर पिस्तूल रोखून शिवेंद्रसिंहराजेंना खल्लास करतो,’ असे उदयनराजे म्हणाल्याची तक्रार शिवेंद्रसिंहराजेंचे कार्यकर्ते विक्रम पवार यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.
उदयनराजे भोसले, सनी भोसले, अमर किर्दत, प्रीतम कळसकर व इतर १०० ते १५० कार्यकर्ते गुरुवारी रात्री साडेबारा वाजता सुरुचिवर आले. उदयनराजेंनी पिस्तूल रोखून शिवेंद्रसिंहराजेंना खल्लास करतो, असे म्हटल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अज्ञाताने दोन राऊंड फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा गोंधळ सुरू असताना कार्यकर्ते शिवीगाळही करत होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर उदयनराजेंचे कार्यकर्ते तेथून निघून गेले. जाताना अज्ञात वाहनाने चंद्रसेन पवार आणि रवी पवार यांना उडविले. यामध्ये दोघेही जखमी झाले.

Web Title:  Khadi is chaotic ... khaki bloody! .... Satara kings struggle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.