खाकीने दिला एमडीआरशी लढा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:19 AM2018-12-31T00:19:08+5:302018-12-31T00:19:13+5:30
स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : टीबी हा आजार केवळ गरीब आणि कष्टकरी लोकांनाच होतो, असा समज ...
स्वप्नील शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : टीबी हा आजार केवळ गरीब आणि कष्टकरी लोकांनाच होतो, असा समज असताना सातारा पोलीस दलात काम करणाऱ्या एका महिला कर्मचारीला टीबी झाला. तोही साधा नव्हता तर एमडीआर टीबी होता. मात्र, तिने खचून न जात दोन वर्षे दिलेल्या लढ्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली.
सदन कुटुंबातील अर्चना जाधव (नावात बदल) हिने शारीरिक व्यायाम करून सन २०१२ रोजी सातारा पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाली. तिला पोलीस दलात नोकरी लागल्याने आई-वडील आणि इतर कुटुंबीयांना तिचा मोठा आनंद झाला. कुटुंबातील पहिली महिला पोलीस काम करत असल्याने अभिमान वाटू लागला. गावातील अनेक तरुण मुली तिचा आदर्श घेऊन पोलीस भरतीची तयारीही करू लागल्या.
अर्चना सातारा पोलीस मुख्यालयात काम करत असताना सन २०१४ मध्ये जेवणाची अनियमता, अपुरी झोप आणि सततच्या ताणामुळे ती वारंवार आजारी पडू लागली. दरम्यान, तिचे एका तरुणासोबत विवाह निश्चित झाला. ताप आणि खोकला वाढल्यानंतर तिच्या बेडक्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिला टीबी असल्याचे निदर्शनास आले. हे कुटुंबीयांना कळताच धक्काच बसला.
तिने जिल्हा क्षयरोग केंद्रात तिच्यावर उपचार सुरू होऊन सहा महिने झाले तरी प्रतिसाद मिळत नसल्याने तिची एमडीआरची तपासणी केली. तेव्हा तिला एमडीआर टीबी झाल्याचे निष्पन्न झाले. टीबी वैद्यकीय अधिकाºयांनी तिच्या होणाºया पतीला विश्वासात घेऊन त्याचे लग्न पुढे ढकलण्यास सांगितले. तसेच तिने पोलीस दलातून रजा घेतली. तिने वैद्यकीय अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे औषधोपचार केले. एमडीआरच्या औषधांमुळे तिला साईडइफेक्टचाही त्रास होऊ लागला. दरम्यान, तिला आत्महत्या करण्याचा विचार मनात आला. मात्र, डॉट्स कार्यकर्ते, तिचे कुटुंबीय आणि होणारा पती यांनी तिचे समूपदेशन केले. सलग दोन वर्षे न चुकता औषधोपचानंतर तिचा आजार बरा झाला.