आगाशिव डोंगरावर मॉर्निंग वॉकवाल्यांना खाकीचा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:39 AM2021-05-26T04:39:29+5:302021-05-26T04:39:29+5:30
मलकापूर : येथील आगाशिव डोंगरावर मॉर्निंग वॉकसह डोंगरसफर करणारे हौसे-नवसे फिरतात. मात्र, मंगळवारी सकाळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ...
मलकापूर : येथील आगाशिव डोंगरावर मॉर्निंग वॉकसह डोंगरसफर करणारे हौसे-नवसे फिरतात. मात्र, मंगळवारी सकाळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलिसांनी धडक कारवाई केली. मॉर्निंग वॉकवाल्यांची धरफकड करत बाराजणांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून १२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
आगाशिव डोंगराभोवतालच्या मलकापूरसह कोयना वसाहत, जखीणवाडी, नांदलापूर, मुनावळे, धोंडेवाडी, विंग, चचेगाव व आगाशिवनगर येथील नागरिक महादेवाच्या मंदिरात दर्शनाबरोबरच मॉर्निंग वॉकला जातात. सकाळी फिरण्यासाठी जाणारे व महाविद्यालयीन युवक - युवतींचीही नेहमीच गर्दी असते. हे ओळखून कडक लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी आगाशिव डोंगरांच्या जखीणवाडी, आगाशिवनगर, धोंडेवाडी अशा प्रमुख मार्गांवर पहाटेपासूनच कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. डोंगरावर जाणाऱ्या सर्व वाटा पोलिसांनी सील केल्या होत्या. डोंगरावर आलेल्या भाविकांसह युवकांची पोलिसांनी धरपकड केली. लाॅकडाऊन असूनही प्रशासनाचे नियम डावलून आडमार्गाने डोंगरावर हजेरी लावणाऱ्या १२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या बाराजणांकडून प्रत्येकी एक हजार रुपयेप्रमाणे १२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.