खंडाळ्यात नाले सफाई मोहीम
By admin | Published: July 1, 2017 01:01 PM2017-07-01T13:01:44+5:302017-07-01T13:01:44+5:30
दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत
आॅनलाईन लोकमत
खंडाळा (सातारा) , दि. 0१ : स्वच्छ व सुंदर शहर ही संकल्पना वास्तवात उतरवित खंडाळा नगरपंचायतीने पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत होणार आहे .
खंडाळा नगरपंचायत आस्तित्वात आल्यानंतर शहराच्या विकासाकरता भरीव निधी उपलब्ध झाला. विकासात्मक बाबींबरोबर स्वच्छतेचे महत्व पटवून देत शहरात नव्याने शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंर्तगत नगरपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांच्या वतीने शहरातील स्वच्छतेसाठी नागरिकांना प्रोत्साहीत केले जात आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नगरपंचायतीने नवनवीन संकल्पना राबवित स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत खंडाळा शहारात गतीने काम सुरू केले आहे.
शहरातील नालेसफाई बरोबरच मध्यभागी असलेल्या ओढ़याची स्वच्छता केली जात आहे . त्यामुळे पावसाळ्यात पाणी आणि कचरा अडखळणार नाही . याशिवाय ओढयाच्या लगतच्या जागेचा वापर सार्वजनिक वापराकरीता करता येणे शक्य होणार आहे. वषार्नुवर्ष रखडलेल्या या स्वच्छतेच्या कामामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे .
नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नवनवीन योजना राबवत विकासात्मक वाटचाल करित असताना शहराच्या स्वच्छतेवर भर दिला आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य अबाधित राहण्यास मदत होईल. शहरात विविध योजनांसह स्वच्छतेचा उपक्रम प्रभावीपणे राबविणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष शरदकुमार दोशी यांनी लोकमतशी बोलताना दिली.