खांडेकरांचा भार पंडितांच्या खांद्यावर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:44 AM2021-09-21T04:44:18+5:302021-09-21T04:44:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : वडूज नगरपंचायतीमध्ये सत्तेची समीकरणे बदलली आणि येथील लोकांच्या विकासाबद्दल अपेक्षाही वाढल्या. सरपंचाच्या जागी नगराध्यक्ष ...

Khandekar's burden on the shoulders of Pandits .... | खांडेकरांचा भार पंडितांच्या खांद्यावर....

खांडेकरांचा भार पंडितांच्या खांद्यावर....

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : वडूज नगरपंचायतीमध्ये सत्तेची समीकरणे बदलली आणि येथील लोकांच्या विकासाबद्दल अपेक्षाही वाढल्या. सरपंचाच्या जागी नगराध्यक्ष विराजमान झाले. ग्रामसेवक ऐवजी मुख्याधिकारी आले. स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची प्रथमच वडूज नगरपंचायतीमध्ये नियुक्ती झाली. जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी छाप पाडली. मात्र त्यांची येथील कारकीर्द राजकीय दबावामुळे उठावदार दिसून आली नाही. आता खांडेकरांचा भार नूतन मुख्याधिकारी अमित पंडित यांच्या खांद्यावर पडला आहे.

कोरोनाकाळातही शहरातील काही भागांत नगरपंचायत प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार निदर्शनास आला. तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना आरोग्याच्या दृष्टीने हालचाली दिसून येत नाहीत. सद्य:स्थितील नगरपंचायत इमारत नागरिकांच्यादृष्टीने आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करता धोकादायक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जुनी तहसील इमारत नाममात्र भाडेतत्त्वावर मिळत असताना मुख्याधिकाऱ्यांकडून प्रशासकीय अधिकारी म्हणून झालेली टाळाटाळ वडूजकरांच्या जिव्हारी लागली आहे.

शहराची लोकसंख्या पाहता शहरातील झपाट्याने वाढत असलेली व्याप्ती लक्षात घेता. शहराचा चौफेर विकास साधण्यासाठी त्यांच्या पातळीवरून प्रशासकीय अधिकारी म्हणून ठोस भूमिका असणे महत्त्वपूर्ण होते. शहरातील प्राप्त परिस्थितीचा आढावा घेतला असता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हुतात्म्यांच्या भूमीतील वैभव वाढविण्यासाठी कोणतेच पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे सदृश चित्र पहावयास मिळत आहे. वास्तविक केंद्र व राज्यशासन यांचा भरघोस निधी उपलब्ध असताना या शहराच्या विकासासाठी वार्षिक आराखडा दिसून येत नाही. हुतात्म्यांच्या भूमीत पहिले मुख्याधिकारी म्हणून झालेली नियुक्ती कार्यकालात दृष्टिक्षेपात येणारे विकासात्मक स्वरूपाची कामे दिसून आलेली नाहीत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशासकीय निधी आणि इतर बाबी उपलब्ध असताना होणारी टाळाटाळ वडूजकरांच्या दृष्टीने निश्चितच खेदजनक आहे.

नगरपंचायत इमारत स्थलांतराबाबत निर्णायक भूमिका घेणे आवश्यक होते. शहराची भौगोलिक परिस्थिती पाहून आणि शहराचा नावलौकिक वाढविण्यासाठी निर्णय घेणे क्रमप्राप्त होते. तसेच कोरोना महामारीच्या काळातील तिसऱ्या लाटेचा केंद्रबिंदू सद्यस्थितीतील ही नगरपंचायत इमारत ठरू नये हीच माफक अपेक्षा कर्मचारी व नागरिकांच्यातून उमटत आहे. नगरपंचायतमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि दैनंदिन ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे वास्तविक पाहता नगरपंचायत जबाबदार अधिकारी म्हणून बंधनकारक आहे. याचा विचार करून नूतन मुख्याधिकारी अमित पंडित यांनी त्यांच्या पातळीवरून तातडीने या इमारतीतील कारभार भव्यदिव्य जागेतील म्हणजेच जुन्या तहसील इमारतीमध्ये स्थानापन्न करावा अशी आर्त मागणीही वडूजकरांसह तालुक्यातील जनतेतून होत आहे.

फोटो २०वडूज

वडूजचे नूतन मुख्याधिकारी अमित पंडित यांचे माधव खांडेकर यांनी स्वागत केेले. यावेळी नगराध्यक्ष सुनील गोडसे उपस्थित होते.

Web Title: Khandekar's burden on the shoulders of Pandits ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.