खंडणीबहाद्दरांचा दणका ‘खाकी’लाही !

By admin | Published: October 30, 2014 12:40 AM2014-10-30T00:40:21+5:302014-10-30T00:40:21+5:30

प्रतापसिंहनगरातून मी मनोज बोलतोय : सैदापूर येथे बिल्डर्सच्या कार्यालयाची तोडफोड

The Khanki riot riot khikei too! | खंडणीबहाद्दरांचा दणका ‘खाकी’लाही !

खंडणीबहाद्दरांचा दणका ‘खाकी’लाही !

Next

सातारा : खंडणीबहाद्दरांनी अगदी जोरकसपणे आपले हातपाय अगदी सातारा शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी काही खंडणीबहाद्दरांनी सैदापूर येथील ‘समर्थ बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’च्या मालकालाच खंडणीसाठी धमकावले. संबंधित मालकाने सातारा तालुका पोेलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर संतापलेल्या खंडणीबहाद्दरांनी ‘समर्थ बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’च्या कार्यालयाची तोडफोड केली. विशेष म्हणजे, या प्रकल्पात मुंबईच्या एका पोलीस अधिकाऱ्याचे निकटवर्तीयही आहेत. यामुळे मोकाट सुटलेल्या साताऱ्याच्या खंडणीबहाद्दरांनी ‘खाकी’लाही सोडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा शहरालगत असणाऱ्या सैदापूर येथे ‘समर्थ बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’ असून, त्याचे भागीदार महादेव माळी येथेच राहतात. या प्रकल्पात सत्यवान कदम यांच्यासह अन्य दोन भागीदार आहेत. मंगळवारी दुपारी ३.२० मिनिटांनी त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला आणि ‘आपण माळी बोलताय का..?’ अशी विचारणा केली. माळी यांनी ‘होय’ असे सांगताच ‘तुझी साईट सैदापूरला सुरू असून, ती व्यवस्थित ठेवायची की नाही. ठेवायची असेल तर मला येऊन भेट,’ असे धमकावले. यावर माळी यांनी ‘मी येथे नाही,’ असे सांगितले. यावर पुन्हा एकदा खंडणीबहाद्दराने ‘मी मनोजभाई, प्रतापसिंहनगरातून बोलतोय. तुला जिवे मारून टाकेन. लवकरात लवकर येऊन मला भेट,’ असेही बजावले. या घटनेनंतर घाबरलेल्या माळी यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांही ही तक्रार अदखलपात्र म्हणून दाखल करून घेत कोणीतरी भुरटा असेल, त्याने धमकावले असेल, असे स्पष्ट केले. यानंतर माळी पुन्हा घरी आले. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ‘समर्थ बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’च्या कार्यालयाबाहेर असणाऱ्या रखवालदारांना कोणीतरी मारहाण करत असल्याचे लक्षात आले. यावेळी कार्यालयाची मोडतोड करण्यात आली. घटनेनंतर परिसरातील लोक येथे जमा झाले. त्यांनी आरडाओरडा केरताच हल्लेखोर पळून गेले. (प्रतिनिधी)

Web Title: The Khanki riot riot khikei too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.