खरीप हंगाम विस्तार सप्ताह स्तुत्य उपक्रम : ज्योती पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:49+5:302021-06-11T04:26:49+5:30
पिंपोडे बुद्रुक : कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात राबविण्यात येणाऱ्या विशेष सुविधांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी तालुका कृषी विभागामार्फत ...
पिंपोडे बुद्रुक : कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात राबविण्यात येणाऱ्या विशेष सुविधांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी तालुका कृषी विभागामार्फत आयोजित खरीप हंगाम विस्तार सप्ताह हा स्तुत्य उपक्रम आहे, शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले.
सुलतानवाडी (ता. कोरेगाव) येथे कोरेगाव तालुका कृषी विभागाच्यावतीने आयोजित खरीप हंगाम २०२१ विस्तार सप्ताह अंतर्गत बांधावर फळबाग लागवड प्रारंभ कार्यक्रम प्रांताधिकारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला सातारा जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, कृषी पर्यवेक्षक अरविंद यमगर, विजय वसव, अनंत कर्वे, प्रकाश चव्हाण, विजय भालके, हिमगौरी डेरे, सुनील बर्गे, आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी ८०-१०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये तसेच खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठांची खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शहाजी फडतरे, अविनाश बर्गे, विजय ढाणे, राहुल कळसे, समीर फडतरे, जगन्नाथ फडतरे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------