खंडाळ्यातील खरीप हंगाम बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 06:24 PM2017-08-28T18:24:14+5:302017-08-28T18:34:35+5:30

खंडाळा : नीरा देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहचल्याने खरीप हंगाम बचावला आहे . नीरा देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हा एकदा फुलल्याचे पहायला मिळत आहे.

Kharodali kharif season saved | खंडाळ्यातील खरीप हंगाम बचावला

खंडाळ्यातील खरीप हंगाम बचावला

Next
ठळक मुद्देनीरा-देवघरचे पाणी खंडाळा तालुक्यातील गावांतशिवार पुन्हा फुलल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण तब्बल १७ वर्षांनी अंदोरीच्या शिवारात पाणीनीरा- देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस

खंडाळा : नीरा देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहचल्याने खरीप हंगाम बचावला आहे . नीरा देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हा एकदा फुलल्याचे पहायला मिळत आहे.


या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावनी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावामध्ये व परिसरात पिण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, या भागातील बाजरीचे पीक देखील पाण्याअभावी वाळू लागली होती, त्यामुळे मोर्वे येथील कालव्यावरील पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून नीरा- देवधर धरणातील पाणी उजव्या कालव्यातून खंडाळा तालुक्यापर्यंत सोडण्यात आले असून हे पाणी अंदोरी गावापर्यंत पोहचले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी तब्बल १७ वर्षांनी अंदोरीच्या शिवारात खळाळत आहे.


खंडाळा तालुक्यापर्यंत नीरा देवघरचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी खंडाळा विकास प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आलेली होती, या मागणीनुसार नीरा- देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट यांनी १५ आॅगष्ट पासून पाणी सोडण्याचे नियोजन केले होते.
त्यातच नीरा- देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणात मोठा पाणी साठा झाला आहे. त्याबरोबर नीरा- देवघर, भाटघर या धरणामधुन मोठ्या प्रमाणावर पाणी वीर धरणात सोडण्यात आल्याने धरण भरले आहे. त्यामुळे वीर धरणाच्या डावा व उजवा कालव्यातुन मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे, खंडाळा तालुक्यातही पाऊस नसल्याने नीरा - देवघरच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्याची मागणी जोर धरु लागल्याने नीरा- देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले असल्याने आता खंडाळा तालुकयातील वाघोशी, अंदोरी,कराडवाडी, मोर्वे, लोणी, तोंडल, शिवाजीनगर, भादवडे, शेखमिरवाडी, शिरवळ आदी गावांतील शेतक?्यांना दुष्काळात दिलासा मिळणार असुन पाण्याअभावी जळु लागलेल्या पिकांना देखील जीवनदान मिळणार आहे. अंदोरी मध्ये पाणी दाखल झाल्यावर नीरामाईचे हे पाणी पाहण्यासाठी अंदोरीकरानी मोठी गर्दी केली होती.



मकरंद पाटलांच्या प्रयत्नामुळे काम मार्गी

तालुक्यातील अकरा गावातील ग्रामस्थांच्या मागणी नुसार व आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मोर्वे येथे कालव्यावर तात्पुरता पुल उभारून नीरा -देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले होते, परंतु यावेळी पाणी वाघोशी, कराडवाडी, परिसरात पोहचल्यानंतर लगेचच बंद करण्यात आले होते. मात्र पाणी बंद केल्याने ते अंदोरी गावच्या शिवारात पोहचु शकले नव्हते. त्यानंतर गेल्या तीन महिन्यापासुन पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती.

 

Web Title: Kharodali kharif season saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.