खाशाबा जाधव यांनी खूप कष्टाने कुस्ती परदेशात पोहोचविली : संजीवराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:10 AM2021-03-13T05:10:50+5:302021-03-13T05:10:50+5:30
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय साताराअंतर्गत तालुका क्रीडा संकुल, जाधववाडी (फलटण) येथे जागतिक महिला ...
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय साताराअंतर्गत तालुका क्रीडा संकुल, जाधववाडी (फलटण) येथे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार तथा कार्याध्यक्ष तालुका क्रीडा संकुल समिती समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार, महाराष्ट्र केसरी पैलवान बापूराव लोखंडे, माजी नगरसेवक सुदामराव मांढरे, जाधववाडीच्या सरपंच सीमा गायकवाड आदी उपस्थित होते.
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्ती परंपरा, या जिल्ह्यातील पैलवान यांची उत्तम कामगिरी, विशेषतः जुन्या पिढीतील पैलवानांना मातीवरील (आखाड्यातील) कुस्तीचा सराव असताना ऑलिम्पिक स्पर्धेत मॅटवरील कुस्ती स्पर्धेत विजयश्री संपादन करताना मोठी मेहनत घ्यावी लागत असे. तरीही या मंडळींनी उज्ज्वल यश संपादन केल्याचे नमूद करीत उज्ज्वल कुस्ती परंपरेचा आढावा संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी घेतला.
प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या महिला कुस्ती केंद्रास शुभेच्छा दिल्या. या महिला कुस्ती केंद्रास एन आय एस कुस्ती कोच अनिता गव्हाणे, नॅशनल चॅम्पियन स्मिता बोबडे हे कोच म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा संजीवराजे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
प्रभारी तालुका क्रीडाधिकारी महेश खुटाळे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील गुणवंत महिला खेळाडू काजल सतीश इंगळे, राणी सीताराम पिसे, संजुश्री जयवंत तांबे, ऋतुजा किशोर पवार, काजल सीताराम गायकवाड, काजल विठ्ठल बागल, अंजली मुळीक, केतकी सावंत, कल्याणी भगत, ऐश्वर्या नेवसे, अनुष्का यादव, सोनिया वायाळ यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
क्रीडाशिक्षक अनिल कदम यांनी सूत्रसंचालन केले. तहसीलदार समीर यादव यांनी आभार मानले.
फोटो
मनोगत व्यक्त करताना संजीवराजे नाईक निंबाळकर, शेजारी डॉ. शिवाजीराव जगताप, समीर यादव, अस्मिता गावडे आदी.)