खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास निधी देणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 04:17 PM2024-08-26T16:17:39+5:302024-08-26T16:18:30+5:30

उदयनराजे भोसले यांच्या संरजाम जमिनींची सूट कायम

Khashaba Jadhav will fund the work of the wrestling complex Decision in Cabinet meeting | खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास निधी देणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास निधी देणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : कराड तालुक्यातील गोळेश्वर (जि. सातारा) येथील ऑलिम्पिकवीर स्व. पै. खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास २५ कोटी ७५ लाख सुधारित निधी देण्याचा निर्णय रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी या संकुलास ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या कुस्ती संकुलात आवश्यक त्या इमारती, क्रीडा सुविधा देण्यात येतील. यामध्ये प्रशिक्षण केंद्र, हॉल याचाही समावेश आहे.

उदयनराजे भोसले यांच्या संरजाम जमिनींची सूट कायम

उदयनराजे प्रतापसिंह भोसले यांच्या संरजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना तह्यात सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीमंत भोसले कुटुंबियांची उपजिविका दर्जानुसार व्हावी यासाठी या घराण्याच्या खासगी जमिनी व इतर मालमत्ता यांना द बॉम्बे सरंजाम्स, जहागिर्स अँड अदर इनाम्स ऑफ पॉलिटीकल नेचर, रिझम्शन रुल्स १९५२ मधून त्या त्या आदेशात नमूद अटीं व शर्तींवर सूट देण्यात आली आहे. ही सूट उदयनराजे भोसले यांच्या हयातीनंतर वंश परंपरेने त्यांच्या लिनियल वारसांना चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या निर्णयास अधिन राहून असेल.

Web Title: Khashaba Jadhav will fund the work of the wrestling complex Decision in Cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.