खटाव तालुक्यात शिक्षक संघाला भगदाड, वडूजमध्ये मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 04:23 PM2020-01-09T16:23:24+5:302020-01-09T16:25:56+5:30

खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा जाहीर मेळावा वडूजमध्ये झाला. संघटनेची बांधणी मजबूत करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्यात शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विद्यासागर माने यांच्यासह सुमारे वीस कार्यकर्त्यांनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिक्षक संघास खिंडार पडल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे.

In Khatav taluka, teachers should meet in Vaduj to get rid of teachers | खटाव तालुक्यात शिक्षक संघाला भगदाड, वडूजमध्ये मेळावा

खटाव तालुक्यात शिक्षक संघाला भगदाड, वडूजमध्ये मेळावा

googlenewsNext
ठळक मुद्देखटाव तालुक्यात शिक्षक संघाला भगदाड, वडूजमध्ये मेळावातालुकाध्यक्ष विद्यासागर माने यांच्यासह सुमारे २० कार्यकर्त्यांचा समितीत प्रवेश

वडूज : खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा जाहीर मेळावा वडूजमध्ये झाला. संघटनेची बांधणी मजबूत करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्यात शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विद्यासागर माने यांच्यासह सुमारे वीस कार्यकर्त्यांनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिक्षक संघास खिंडार पडल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे.

समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष शंकरराव देवरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. यावेळी राजन कोरेगावकर, प्रदीप कदम, संतोष घोडके, संचालक किरण यादव, चंद्रकांत मोरे, बँकेचे माजी उपाध्यक्ष कांतआण्णा फडतरे, विश्वंभर रणनवरे, विठ्ठलराव फडतरे, शशिकांत बागल, संजय तिडके, अरुण खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिंदे म्हणाले, खटाव तालुका हा समितीचा बालेकिल्ला होता. अपवाद वगळता या तालुक्याने शिक्षक बँक व इतर संघटना पातळीवरील लढाईत नेहमीच समितीला भक्कम पाठबळ दिले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे मागच्या वेळेस निवडणुकीत एक जागा कमी झाली. मात्र आत्ता नवीन होतकरू कार्यकर्त्यांनी संघटनेची मजबूत बांधणी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे निश्चितपणे भविष्यकाळात परिवर्तन होईल.

या मेळाव्यात संघाचे अध्यक्ष सागर माने यांच्यासह प्रसाद महामुनी, दत्तात्रय सावंत, संग्राम गोसावी, नंदराज हडस, संदीप चंदनशिवे, हणमंत जाधव, सतीश खाडे, बाबासाहेब केदार, प्रभाकर गायकवाड, आनंदराव खाडे, सुभाष सलगर, अनिता माने, योगिता गोसावी, सीमा चंदनशिवे, आशा खाडे, स्वाती जाधव आदींनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केला.

तालुकाध्यक्ष अर्जुन यमगर, सरचिटणीस नवनाथ जाधव यांनी स्वागत केले. रणनवरे यांनी प्रास्ताविक केले. आबासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष शिवाजी लखापते, माजी सरचिटणीस विजय गोरे, किरण गोडसे, पोपट माळवे, उमेश पाटील, गोविंद माळवे, सुनील खाडे यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते.

गटबाजीला कंटाळून प्रवेश....

गेली अनेक वर्षे आपण शिक्षण संघामध्ये प्रामाणिक काम केले. अडचणीच्या काळात बँकेची निवडणूकही लढविली. मात्र अलीकडच्या काळात संघटनेत मोठ्या प्रमाणावर गटबाजी वाढली आहे. या गटबाजीमुळे तळागळात काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत आहे. या प्रकारास कंटाळून आपण शिक्षक समितीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, असे मत सागर माने यांनी यावेळी व्यक्त केले.

 

Web Title: In Khatav taluka, teachers should meet in Vaduj to get rid of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.