खटावचा श्लोक हजारे एअरगन राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:07 AM2021-02-05T09:07:23+5:302021-02-05T09:07:23+5:30
खटाव : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र एअरगन राज्यस्तरीय स्पर्धेत खटावचा सुपुत्र श्लोक सतीश हजारे याने वयाच्या अकराव्यावर्षी दुसरा क्रमांक ...
खटाव : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र एअरगन राज्यस्तरीय स्पर्धेत खटावचा सुपुत्र श्लोक सतीश हजारे याने वयाच्या अकराव्यावर्षी दुसरा क्रमांक पटकावला. या यशस्वी कामगिरीमुळे राष्ट्रीय पातळीवर या स्पर्धेकरिता सहभागी होण्यासाठी तो पात्र ठरला आहे.
मुंबई येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात शूटिंग रेंज येथून श्लोक या स्पर्धेत सहभागी झाला होता. महाराष्ट्र एअरगन स्पर्धा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घेतली होती. या ओपन साईट एअर रायफल शूटिंग स्पर्धेत श्लोक याने चारशेपैकी तीनशे गुण मिळून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कोल्हापूरच्या प्रणव पवार याने ३२३ गुण मिळून प्रथम क्रमांक, कोल्हापूरच्याच राजवर्धन जगदाळे याने २९१ गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला.
श्लोक याची या एअरगन स्पर्धेच्या यशानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून नेतृत्व करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. याच्या यशस्वी वाटचालीत त्याला त्याचे वडील सतीश हजारे याचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्याला स्नेहल पापणकर, जितेश कदम, भूषण कुलकर्णी, सुशांत धुरी, अमृता कारखानीस, निरू मिश्रा याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. यशाबद्दल आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख यांनी कौतुक केले.
फोटो : २९श्लोक हजारे