खातगुणच्या ब्रिटिशकालीन धरणाचे होणार पुनरुज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:40 AM2021-02-11T04:40:46+5:302021-02-11T04:40:46+5:30

पुसेगाव : येरळा नदी आणि राम ओढ्याच्या संगमावरील खातगुण (ता. खटाव) येथील ब्रिटिशकालीन ‘गज’ धरणाचे पुनरुज्जीवन करण्याची शिफारस खासदार ...

Khatgun's British-era dam will be revived | खातगुणच्या ब्रिटिशकालीन धरणाचे होणार पुनरुज्जीवन

खातगुणच्या ब्रिटिशकालीन धरणाचे होणार पुनरुज्जीवन

Next

पुसेगाव : येरळा नदी आणि राम ओढ्याच्या संगमावरील खातगुण (ता. खटाव) येथील ब्रिटिशकालीन ‘गज’ धरणाचे पुनरुज्जीवन करण्याची शिफारस खासदार शरद पवार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. खातगुणच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने या कामासाठी खा. पवार यांची बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेतली.

शिष्टमंडळाने खा. शरद पवार यांना विविध कामांचे निवेदन सादर केले. शरद पवार यांनी धरणाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून तातडीने पुनरुज्जीवन कामासाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. लवकरच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांसमवेत लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांची मंत्रालयात बैठक होणार असून, धरणाच्या कामाला गती मिळेल, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य अमिना सय्यद यांनी दिली.

ब्रिटिश कंपनीने १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीबरोबर पत्रव्यवहार करून धरणाची मुदत संपली असल्यामुळे तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, अशी सूचना केली होती. त्यानंतर धरणाची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली; परंतु महापूर आणि बांधकाम जीर्ण झाल्यामुळे धरणाच्या भिंतींना तडे जात आहेत. मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. धरणाची तातडीने दुरुस्ती केली नाही तर धरण फुटून मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे या धरणाची दुरुस्ती व पुनरुज्जीवन व्हावे ही ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार नवनिवार्चित सदस्यांनी खा. शरद पवार यांची भेट घेऊन या कामासाठी सरकारकडे पाठपुरवठा करावा, अशी विनंती केली.

यावेळी अमिना सय्यद, वसंतराव जाधव, श्यामराव भोसले, गजानन लावंड, प्रमोद भोसले, विवेक जाधव उपस्थित होते.

(चौकट)

१७०० हेक्टर जमीन ओलिताखाली

खातगुणच्या गज धरणाचे बांधकाम १८६७ साली झाले. धरणाचे संपूर्ण बांधकाम दगडी असून, त्याची लांबी ३०० मीटर, रुंदी ७ फूट आणि उंची ३० फूट आहे. धरणाला दोन कालवे आहेत. उजवा कालवा २५ तर डावा कालवा १४ किलोमीटर लांबीचा आहे. धरणाच्या पाण्यावर सुमारे १७०० हेक्टर जमीन ओलिताखाली असून, दुष्काळी भागासाठी हे धरण संजीवनी आहे.

फोटो : १० खातगुण

खातगुण (ता. खटाव) ग्रामस्थांनी खासदार शरद पवार यांची बारामती येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना धरणाच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले.

Web Title: Khatgun's British-era dam will be revived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.