Khelo India Youth Games 2022 : साताऱ्याच्या सुदेशना शिवणकर हीची सुवर्ण पदकाची हॅटट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:44 PM2022-06-09T12:44:46+5:302022-06-09T12:46:03+5:30

खेलो इंडिया यूथ स्पर्धेत साताऱ्याचा डंका

Khelo India Youth Games 2022: Sudeshna Shivankar Gold Medal Hattrick | Khelo India Youth Games 2022 : साताऱ्याच्या सुदेशना शिवणकर हीची सुवर्ण पदकाची हॅटट्रिक

Khelo India Youth Games 2022 : साताऱ्याच्या सुदेशना शिवणकर हीची सुवर्ण पदकाची हॅटट्रिक

googlenewsNext

सातारा : साताऱ्याच्या सुदेशना शिवणकर हीने खेलो इंडिया यूथ स्पर्धेत सुवर्ण पदकाची हॅटट्रिक केली आहे. १०० मीटर, ४ बाय १०० आणि २०० मीटर धावणे स्पर्धेत तिने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. तीच्या या यशामुळे खेलो इंडिया यूथ स्पर्धेत साताऱ्याचा डंका वाजला.

अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या "४थ्या खेलो इंडीया यूथ गेम्स" स्पर्धेचे आयोजन दि. ३ ते १३ जून २०२२ या कालावधीत हरियाना - पंचकुला येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील "खरशी" गावची कन्या सुदेशना हणमंत शिवणकर महाराष्ट्राच्या एँथलेटिक्स संघातून सहभागी झाली आहे. सुदेशना शिवणकर हिने पहिला १०० मीटर धावणे मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. यानंतर २०० मीटर धावणे, ४ बाय १०० मीटर धावणे रिले या क्रीडा प्रकारातही तीने सुवर्ण पदक पटकावत हॅटट्रिक केली.

सुदेशनाने मिळविलेल्या यशाबद्दल तीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सुदेशना हिने १०० मीटर मध्ये ११.७९ सेकंदाची उत्कृष्ट वेळ नोंदवल्याने जागतीक ज्युनिअर एथलेटिक्स स्पर्धा कोलंबिया- केली या स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे.

Web Title: Khelo India Youth Games 2022: Sudeshna Shivankar Gold Medal Hattrick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.