खोडजाईवाडी स्मार्ट व्हिलेज म्हणून उदयास येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:15+5:302021-07-01T04:26:15+5:30
मसूर : खोडजाईवाडीच्या ग्रामस्थांनी केलेल्या त्यागातूनच झालेल्या धरणामुळे शिवारात जलक्रांती झाली. तसेच धरणासाठी गेलेल्या जमिनीचाही येथील ग्रामस्थांना अपेक्षित ...
मसूर : खोडजाईवाडीच्या ग्रामस्थांनी केलेल्या त्यागातूनच झालेल्या धरणामुळे शिवारात जलक्रांती झाली. तसेच धरणासाठी गेलेल्या जमिनीचाही येथील ग्रामस्थांना अपेक्षित मोबदला मिळाल्याने त्यांच्यात आर्थिक परिवर्तन झाले. या गावात होत असलेल्या विकासकामांमुळे खोडजाईवाडी लवकरच स्मार्ट व्हिलेज म्हणून उदयास येईल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
खोडजाईवाडी (ता. कराड) येथे मंत्री पाटील यांच्या विकासनिधीतून अंतर्गत काँक्रीट रस्ते, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत विस्तारीकरण व अंतर्गत काँक्रीट रस्ते, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून क्लोरीन गॅस पाणी शुद्धीकरण युनिटच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, सभापती प्रणव ताटे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे, माजी उपआयुक्त तानाजीराव साळुंखे, आदर्श सरपंच शहाजी क्षीरसागर, माजी सभापती शालन माळी, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विजय साळुंखे, लालासाहेब पाटील, लहुराज जाधव, संजय थोरात, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, सरपंच विमल पवार, मानसिंगराव मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सुनील माने म्हणाले, काहीजण मते पाहून किती विकास करायचा ते ठरवतात. परंतु पालकमंत्री पाटील यांनी कधीही मते व तोंडे पाहून विकास केला नाही. असे विकासप्रिय नेतृत्व या मतदारसंघाला लाभले हे आपले भाग्य आहे. यावेळी संगीता साळुंखे, मानसिंगराव जगदाळे, डॉ. विजय साळुंखे यांची भाषणे झाली.
स्वागत सरपंच विमल पवार यांनी केले सूत्रसंचालन बजरंग कोकाटे यांनी केले. प्रास्ताविक संभाजी मांडवे यांनी केले तर आभार सागर गोडसे यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते.
कोट - सध्या वीज वितरण कंपनीच्या थकबाकीपोटी राज्यातील अनेक गावे अंधारात असून जुनी थकबाकी देणे स्थानिक स्वराज्य संस्थांना परवडणारे नाही. यावर सर्वांच्या समन्वयातून राज्य शासन निश्चितच मार्ग काढेल व सध्या अंधारात असणाऱ्या गावांचा अंधार नाहीसा करून प्रकाश देण्याचे काम करेल.
-मंत्री बाळासाहेब पाटील
फोटो कॅप्शन- खोडजाईवाउी येथे अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरणप्रसंगी मंत्री बाळासाहेब पाटील, सुनिल माने, मानसिंगराव जगदाळे, संगीता साळुंखे, शहाजी क्षीरसागर व इतर